ड्रग्सप्रकरणी अभिनेत्री रकुल प्रीत सिंहची आज ‘एनसीबी’कडून होणार चौकशी

Rakul Preet Singh to be questioned by NCB.jpg

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. यामध्येच अभिनेत्री रकुल प्रीतसह (Rakul Preet Singh) बॉलिवूडमधील काही दिग्गज अभिनेत्रींची नावं समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या .

रकुल प्रीत सिंह ‘एनसीबीच्या (NCB) कार्यालयात पोहोचली असून सकाळी 11 वाजता तिची चौकशी होणार आहे .

अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली. मात्र आपल्याला एनसीबीचे समन्स मिळाले नाहीत असं रकुलने माध्यमांना सांगितलं होतं. मात्र, एनसीबीने यावर भाष्य करत रकुलला समन्स मिळाल्याचं स्पष्ट केलं. विशेष म्हणजे एनसीबीने स्पष्ट केल्यानंतर थोड्याच वेळात रकुलने समन्स स्वीकारले. तसंच तिने घराचा नवीन पत्तासुद्धा सांगितल्याचं एनसीबीकडून सांगण्यात आलं. त्यामुळे आज शुक्रवारी (२५ सप्टेंबर) रकुलची चौकशी होणार आहे.

रकुलसोबतच दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिचीदेखील आजच चौकशी होणार आहे. तर दीपिकाची शनिवारी (२६ सप्टेंबर) चौकशी करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER