रामदास आठवलेंच्या पाठिंब्यानंतर अभिनेत्री पायल घोषच्या हाती ‘आरपीआय’ (RPI) चा झेंडा!

Payal Gosh

मुंबई : चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप लावल्यानंतर अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) चर्चेत आली होती. यानंतर आरपीआयचे सर्वेसर्वा डॉ.रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) पाठिंबा दर्शवला होता. यानंतर आता पायलने हाती आरपीआयचा झेंडा घेत राजकारणात प्रवेश केला आहे.

रामदास आठवलेंनी आज (26 ऑक्टोबर) पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत पायलचा पक्ष प्रवेश पार पडला आहे. पायल घोषसह अभिनेत्री कनिष्का सोनी, बिल्डर योगेश करकेरा, उद्योजक अंकूर चाफेकर यांनी आरपीआयमध्ये पक्षप्रवेश केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER