अभिनेत्री मंदाना करीमीनेही निर्मात्यावर लावला लैंगिक शोषणाचा आरोप

बॉलिवूड मध्ये अभिनेत्रींना लैंगिक शोषणाचे अनुभव येत असतात. अनेकदा काम मिळावे म्हणून नायिका शोषण सहन करतात, तर काही जणी त्याला विरोध करतात. अशा अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत. त्यात आता मंदाना करीमीचीही ही भर पडली आहे.

मंदाना करीमी (Mandana Karimi) सध्या ‘कोका कोला’ चित्रपटात काम करीत असून त्याचे शूटिंग सुरू आहे. मंदानाने निर्माता महेंद्र धारिवाल यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. या घटनेबाबत माहिती देताना मंदाना म्हणते, शूटिंगच्या शेवटच्या दिवशी जी घटना घडली त्या धक्क्यातून मी अजूनही बाहेर आलेली नाही. दिवाळीच्या आदल्या दिवशी आम्ही शूटिंग करत होतो आणि तो चित्रपटाच्या शूटिंगचा शेवटचा दिवस होता. गेल्या एक सव्वा वर्षापासून आम्ही कोका कोला चित्रपटाचे काम करीत आहोत. या चित्रपटाची टीम प्रोफेशनल नसतानाही मी त्यांच्यासोबत काम करीत आहे. खरे तर पहिल्या दिवसापासूनच या टीमसोबत काम करताना मला सतत अडचणी येत होत्या. निर्माता महेंद्र धारिवाल हे जुन्या वळणाचे निर्माते असून ते पुरुषी विचारधारेचे आहेत आणि सेटवर ते त्यांची पुरुषी विचारधारा राबवत असतात. एखाद्या व्यक्तीचा इगो सांभाळून सेटवर काम केले जाते आणि हे नवीन नाही. परंतु 13 नोव्हेंबरला जे घडले त्याने मी अंतर्बाह्य हादरून गेले आहे.

शूटिंगचा शेवटचा दिवस असल्याने मी माझे काम लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करीत होते. कारण काम संपवून एका व्यक्तीला मला भेटायला जायचे होते. त्यामुळेच दोन दिवसापासून मी सकाळी लवकर येऊन शूटिंग पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत होते. खरे तर माझे सीन जास्त नव्हते तरीही मी सेटवर उपस्थित राहत असे. त्यादिवशी निर्मात्यांनी मला आणखी एक तास थांबण्याची विनंती केली, परंतु मी अगोदरच अपॉइंटमेंट घेतलेली असल्याने थांबू शकत नव्हते. आम्ही एका गाण्याचे शूटिंग करत होतो. शूटिंग झाले आणि मी कपडे चेंज करण्यासाठी माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेली. मात्र तेथे लगेचच निर्माता धारिवाल जबरदस्तीने आले. आणि माझ्यावर ओरडत अजून एक तास थांबण्यास सांगू लागले. खरे तर ब्रेकअप झाल्याचे सेटवर दिग्दर्शक व सहाय्यक दिग्दर्शक कोणीही उपस्थित नव्हते. माझ्या व्हॅनच्या येथे कोरिओग्राफर असल्याने त्याने निर्मात्याला व्हॅनिटी व्हॅनबाहेर काढले असेही मंदानाने सांगितले.

मंदानाने पुढे सांगितले, जेव्हा मी तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा निर्मात्याच्या मुलाने माझी गाडी थांबवली. पण कोरियोग्राफरच्या मदतीने त्याच्या कारमधून मी निघून गेले.

निर्माता महेंद्र धारिवाल यांनी मात्र मंदानाचे आरोप खोडून काढले असून, ती अनप्रोफेशनल वागत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पुढे सांगितले, कोरोना संसर्ग सुरू होण्यापूर्वी आमच्या कोका कोला चित्रपटाचे शूटिंग सनी लियोनी आणि मंदानासोबत करीत होतो. लॉक डाऊन मुळे आमचे शूटिंग बंद झाले. त्यानंतर पुन्हा जेव्हा शूटिंग सुरू झाले, तेव्हा आम्ही आमचे काम परत सुरू केले. मंदानाला आम्ही सात लाख रुपयात साइन केले होते. परंतु जेव्हा पुन्हा शूटिंग सुरू झाले तेव्हा ती नखरे करू लागली. दिल्लीच्या शूटिंगमध्ये तिने आणखी दोन लाख रुपयांची मागणी केली. एवढेच नव्हे तर लॉकडाऊनच्या नंतर डेट्स देण्यासही ती नकार देत होती. मी तिला सगळे पैसे ॲडव्हान्स दिले होते. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी काम पूर्ण न करताच ती दोन तास अगोदरच निघाली होती. आणखी काही शॉट बाकी असल्याने तिला थांबवण्यासाठी मी तिच्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये गेलो होतो. परंतु मी व्हॅनिटी व्हॅन मध्ये गेलो तेव्हा मंदानाने माझा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. मी तिच्या व्हॅनमध्ये थेट घुसलो नव्हतो तर नॉक करून गेलो होतो असेही ते म्हणाले.

पुढे त्यांनी सांगितले, मंदानाला आतापर्यंत 17 लाख रुपये दिले असून मी पैसे खर्च करण्यास कचरत नाही परंतु मंदाना प्रोफेशनल वागत नसल्याचा आरोपही महेंद्र धारिवाल यांनी केला.

या दोघांच्या या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आहेत ही खरोखर आहेत हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER