रियाच्या घरावर अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती समीर यांनी टाकली एनसीबीची धाड

Kranti Redkar

मुंबई : सुशांत सिंहच्या (Sushant singh Rajput) संशयास्पद मृत्युप्रकरणात मादक द्रव्यांचा वापर आणि व्यापार विषय आला; यात रियाच्या घरावर अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने  (एनसीबी) (NCB)  धाड टाकली. ही धाड अभिनेत्री क्रांती रेडकरचे (Kranti Redkar) पती समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी टाकली ! समीर हे एनसीबीमध्ये अधिकारी आहेत. ते इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसचे (आयआरएस)  ऑफिसर आहेत.

समीर यांनी अनेक बॉलिवूड स्टार्सच्या घरी धाडी टाकल्या आहेत. त्यात विवेक ओबेरॉय, अनुराग कश्यप, रामगोपाल वर्मा यांचा समावेश आहे. २०१३ मध्ये मिका सिंगला मुंबई विमानतळावर विदेशी करन्सीबाबत पकडण्यात आले, ती कारवाईदेखील समीर यांनीच केली होती. समीर आणि क्रांती रेडकर यांनी २०१७ मध्ये लग्न केले.

लग्न गुपचूप उरकले होते. काही खास मंडळीच हजर होती. त्यांना जुळी मुले आहेत. क्रांतीने २००३ मध्ये ‘गंगाजल’ चित्रपटात काम केले आहे. तसेच ‘कोंबडी पळाली’ गाण्यासह जत्रा, माझा नवरा तुझी बायको, फूल थ्री धमाल- अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता सुशांत सिंह राजूपत आत्महत्याप्रकरणी समीर तपास करत आहेत.

ते त्यांच्या टीमसोबत शुक्रवारी सकाळी तपासासाठी रिया चक्रवर्तीच्या घरी गेले होते. त्यानंतर एनसीबीची टीम शोविकला घेऊन गेली. या प्रकरणी ड्रग्स कनेक्शनबाबत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने शोविकसोबत अटक केलेल्या ड्रग पॅडलर बासित आणि झैद यांचीही चौकशी केली. सर्वांना एकत्र बसवून त्यांचे जबाब नोंदवून घेतले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER