अनिल कपूर आणि विनोद खन्नासोबत हॉट सीन देणारी अभिनेत्री

Anil Kapoor - Vinod Khanna

बॉलिवुडमध्ये (Bollywood) नायिकांनी अंग प्रदर्शन करणे आणि नायकासोबत हॉट सीन देणे यात नवल नाही. अनेक नायिकांनी अशी दृश्ये दिलेली आहेत. परंतु ज्याप्रमाणे साऊथच्या चित्रपटात हॉट सीन्सचा भरपूर वापर होतो तसा हिंदी चित्रपटात होत नाही. परंतु जेव्हा साऊथची एखादी नायिका हिंदीत येते तेव्हा मात्र निर्माते तिच्याकडून भरपूर हॉट दृश्ये अवश्य करवून घेतात. या नायिकाही मग नायकाचे वय न पाहाता हॉट सीन्स देतात. अशाच नायिकांपैकी एक नायिका आहे रम्या कृष्णन. बाहुबलीमधील शिवगामीची भूमिका साकारणारी हीच ती रम्या. या भूमिकेमुळेच प्रेक्षक तिला आता ओळखू लागले आहेत. दक्षिणेत सुपरस्टार असलेल्या रम्याला बॉलिवुडमध्ये आणले यश चोप्रा (Yash Chopra) यांनी. 1992 मध्ये यश चोप्रा परंपरा नावाचा चित्रपट करीत होते. विनोद खन्नाच्या नायिकेच्या भूमिकेसाठी त्यांनी रम्याला साईन केले. त्यावेळी विनोद खन्ना रम्यापेक्षा 23 वर्षांनी मोठा होता. या चित्रपटात दोघांवर अत्यंत हॉट असे दृश्य चित्रित करण्यात आले होते. रम्याने विनोद खन्नासोबत (Vinod Khanna) एक चुंबनदृश्यही दिले होते. या दोघांची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. तू सावन मैं प्यार या गाण्यात रम्याने भरपूर अंग प्रदर्शन केले होते. हे गाणेही लोकप्रिय झाले होते. यानंतर 1995 मध्ये रम्याने सुभाष घई (Subhash Ghai) यांच्या त्रिमूर्तिमध्ये अनिल कपूरसोबत (Anil Kapoor) हॉट सीन्स दिले होते. मात्र एडिटिंगमध्ये तिचे हे हॉट सीन काढून टाकण्यात आले होते. परंतु त्या सीनचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. याशिवाय वजूद चित्रपटात नाना पाटेकरसोबतही (Nana Patekar) तिने चुंबन दृश्य दिले होते.

रिचा चड्ढा (Richa Chadda) लिहितेय आत्मचरित्र

बॉलिवुडमधील कलाकार तरुणपणातच आपले आत्मचरित्र लिहू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी अशा काही कलाकारांची नावे आम्ही आमच्या वाचकांना सांगितली होती. त्यात आता रिचा चड्ढाच्या नावाचीही भर पडणार आहे. खरे तर रिचा लग्नाच्या गडबडीत आहे. रिचा आणि अली फजल यावर्षीच लग्न करणार होते परंतु लॉकडाऊनमुळे (Lockdown) त्यांना लग्न करता आले नाही. आता पुढील वर्षी लग्न करण्याचा निर्णय या दोघांनी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी गांजाबाबत वक्तव्य करूनही रिचा वादात सापडली होती. गांजाचे औषधी उपयोग असून सगळे जग त्याचा वापर करीत आहे. त्यामुळे थोडा रिसर्च करून या निसर्गाने दिलेल्या देणगीचा अपमान करू नका असे तिने म्हटले होते. तिच्या या वक्तव्यावरून ती खूप ट्रोलही झाली होती. आता तिने पुस्तक लिहित असल्याचे सांगितले आहे. रिचाने स्वतः याबाबत माहिती देताना सांगितले, मला लिखाणाची आवड असून गेल्या वर्षीपासून मी माझ्या जीवनातील घटना लिहिण्यास सुरुवात केली होती. थोडक्यात पुस्तक लिहिण्यासही सुरुवात केली होती. लॉकडाऊनमुळे मला जास्तीत जास्त वेळ मिळाला आणि तो वेळ मी पुस्तक पूर्ण करण्यात घालवला. या पुस्तकात मी माझ्या मनातील सर्व विचार लिहिले असून वाचकांना ते नक्कीच आवडतील. पुस्तक लिहिणे हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे, पुस्तक जवळ जवळ पूर्ण झाले असून पुढील वर्षी प्रकाशित करण्याचा विचार असल्याचेही रिचाने सांगितले.

या नायकाला मिळाला होता उत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार

एखाद्या नायकाने एखाद्या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली आणि त्यात एक भूमिका नायकाची आणि दुसरी खलनायकाची असेल तर नायकाची भूमिकाच जास्त चांगली असते. परंतु एका कलाकाराच्या बाबतीत उलटे झाले होते. त्याने एका चित्रपटात दुहेरी भूमिका केली. त्यातील एक नायकाची आणि दुसरी खलनायकाची होती. मात्र त्याला एकाच नव्हे तर दोन-दोन पुरस्कार समारंभात उत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार देण्यात आला आणि तो त्याने स्वीकारलाही. एवढेच नव्हे तर बॉलिवुडमध्ये खलनायकाची भूमिका करणाऱ्या अनेक कलाकारांना भितीही वाटू लागली होती. परंतु त्या नायकाने पुन्हा खलनायकाची भूमिका केली नाही. हा नायक आहे मिथुन चक्रवर्ती आणि त्याच्या चित्रपटाचे नाव आहे जल्लाद. या चित्रपटात मिथुनने क्रांती कुमार नावाच्या इन्स्पेक्टरची आणि अमावस नावाच्या खलनायकाची भूमिका साकारली होती जो त्याचा पिताही असतो. आपल्या या पित्याचा तो का आणि कसा बदला घेतो त्याची ही कथा होती. विशेष म्हणजे टीएलव्ही प्रसाद द्वारा दिग्दर्शित या चित्रपटात कादर खान आणि शक्ती कपूरही होते. एकाच चित्रपटात नायक आणि खलनायकाची भूमिका साकारत असताना उत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळणे हे अभावानेच आढळते आणि मिथुनने ही करामत करून दाखवली आहे. मिथुनच्या नावावर अनेक विक्रम आहेत त्याबाबत नंतर कधी तरी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER