टॉपलेस फोटोशूट करणाऱ्या अभिनेत्री

Heroine

बॉलिवूडमध्ये नायिकांना अंगप्रदर्शन करण्यासाठी आणि नायकाच्या रोमांसची गरज भागवण्यासाठीच मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. शूटिंगच्या दरम्यान नायिकेचे अंग जास्तीत जास्त कसे दिसेल याची पूर्ण काळजी निर्माते-दिग्दर्शक घेत होते, घेत आहेत आणि पुढेही घेत राहाणार आहेत. स्त्री-पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी यात काहीही बदल होणार नाही. आणि त्यामुळेच चित्रपटसृष्टीतील मुली बिनधास्त अंगप्रदर्शन करतात. कारण यामुळेच आपण पुढे जाऊ शकतो याची त्यांना पूर्ण खात्री असते. केवळ चित्रपटातच नव्हे तर काही जणींनी बिनधास्तपणा दाखवत टॉपलेस फोटोशूट करून खळबळही माजवली होती. अर्थात असे टॉपलेस फोटो शूट करून त्यांच्या कारकिर्दीची किती भरभराट झाली हे त्यांनाच ठाऊक. आज आम्ही आमच्या वाचकांना अशाच टॉपलेस फोटो शूट करणाऱ्या नायिकांची माहिती देत आहोत.

या यादीत रेखाचे (Rekha) नाव वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. परंतु १९७८ मध्ये ‘फिल्म मिरर’ नावाच्या एका सिने मासिकाच्या मुखपृष्ठासाठी रेखानेही टॉपलेस फोटोशूट केले होते. या फोटोने तेव्हा प्रचंड खळबळ माजवली होती. अर्थात रेखा तेव्हा यशासाठी चाचपडत होती आणि त्यातच ती फार बिनधास्तही होती. चित्रपटात चुंबनदृश्य देण्यासही ती तयार असायची. याच दरम्यान जेव्हा तिला या मासिकासाठी न्यूड फोटो शूट करण्याची ऑफर दिली तेव्हा तिने ती लगेचच स्वीकारली आणि न्यूड फोटो शूट केले होते.

रेखानंतर टॉपलेस नायिकांच्या यादीत जर कोणाचे नाव घ्यायचे असेल तर ते ममता कुलकर्णीचे (Mamata Kulkarni) घेता येईल. ममता कुलकर्णीची कारकीर्द काही फार मोठी नव्हती. परंतु तिने जो काही काळ बॉलिवूडमध्ये घालवला त्यात ती नेहमी चर्चेत राहिली. सगळ्या मोठ्या नायकांबरोबर तिने काम केले होते. मात्र याच ममताने ‘स्टारडस्ट’ या इंग्रजी चित्रपट मासिकाच्या मुखपृष्ठासाठी टॉपलेस फोटो शूट केला होता. १९९३ मध्ये ममता नवी नवी बॉलिवूडमध्ये आली होती. तिचे काही चित्रपट प्रदर्शित झाले होते; परंतु म्हणावे तसे यश मिळाले नव्हते. याच दरम्यान तिने टॉपलेस फोटो शूट केला आणि तो छापून आल्यावर चांगलीच खळबळ माजली होती. तिच्या विरोधात पोलीस तक्रारही झाली होती आणि तिला दंडही ठोठावण्यात आला होता. परंतु या फोटोमुळे तिच्याकडे चित्रपटाच्या ऑफर नक्कीच वाढल्या होत्या.

९० च्या दशकात पूजा भट्टनेही (Pooja Bhatt) अनोख्या पद्धतीने फोटो शूट करून खळबळ माजवली होती. पूजाने अंगावर एकही कपडा घातला नव्हता आणि संपूर्ण शरीरावर रंगाने कपड्यांचे डिजाईन केले होते. बर्थडे सूट असे पूजाच्या फोटोला नाव दिले होते. आणि विशेष म्हणजे पूजाने आपल्या १८ व्या वाढदिवसानिमित्त हे फोटो शूट केले होते. या फोटोमुळे प्रचंड खळबळ माजली होती. याचे राजकीय पडसादही उमटले होते.

याच काळात प्रख्यात मॉडेल मिलिंद सोमणसोबत मॉडेल मधु सप्रेने अंगावर एकही कपडा न ठेवता एका जाहिरातीचे फोटो सेशन केले होते. मिलिंद सोमणही संपूर्ण उघडा होता आणि या दोघांनी एका अजगराला स्वतःभोवती लपेटून घेतले होते. या जाहिरातीनेही प्रचंड खळबळ माजवली होती. या दोघांविरोधात मुंबई पोलिसांनी अश्लीलता पसरवत असल्याचा गुन्हा दाखल केला होता. या खटल्यातून मुक्त होण्यास या दोघांना अनेक वर्षे लागली होती.

आपल्या अंगप्रदर्शनाने नेहमी चर्चेत राहणाऱ्या पूनम पांडेने आपल्या पहिल्याच ‘नशा’ या चित्रपटासाठी टॉपलेस फोटो शूट केले होते. मुंबईतील काही संघटनांनी याचा विरोध करीत चित्रपटाचे पोस्टर्स फाडले होते. वाद निर्माण करून चित्रपट यशस्वी करण्याचा पूनमचा प्रयत्न होता; परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही आणि हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला.

२०१३ मध्ये आलेल्या ‘हेट स्टोरी’ चित्रपटासाठी बंगाली अभिनेत्री पाओली डॅमने बॅकलेस फोटोशूट केले होते. कोलकात्यात तेव्हा प्रचंड हंगामा झाला होता. परंतु हा चित्रपटही विशेष चालला नाही. तरीही ‘हेट स्टोरी’चा पुढचा भाग ‘हेट स्टोरी-२’ म्हणून काढण्यात आला. यातही नग्नतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते; परंतु प्रेक्षकांनी यालाही थारा दिला नाही.

नव्या नायिकांमध्ये जॅकलीन फर्नांडिसने डोक्यावरील केसांच्या रंगांच्या एका उत्पादनासाठी टॉपलेस फोटोशूट केले होते. परंतु तिने आपले सगळे केस पुढे घेऊन पुढील भाग झाकला होता. नायिका ईशा गुप्तानेही एफएचएम मासिकाच्या मुखपृष्ठासाठी टॉपलेस फोटोशूट केले होते. ब्रुना अब्दुल्ला या मॉडेलनेही टॉपलेस फोटोशूट करून खळबळ माजवली होती. पूजा भट्टची बहीण आणि आता लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या आलिया भट्टनेही डब्बू रत्नानीसाठी टॉपलेस फोटोशूट केले होते. याशिवाय शमा सिकंदर, कृतिका कामरा. कश्मीरा शाह आणि मंदिरा बेदी यांनीही टॉपलेस फोटोशूट करून आपल्या आधुनिकपणाचे दर्शन घडवले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER