माल है क्या? ; ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात अभिनेत्री दीपिका पदुकोण , नम्रता शिरोडकर एनसीबीच्या रडावर

Namrata Shirodkar - Deepika Padukone

मुंबई :- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी जोडूनच समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शनला दर दिवशी आता नवी वळणं मिळू लागली आहेत. या प्रकरणात मोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे समोर आल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत .

अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला चौकशीसाठी एनसीबीकडून समन्स पाठवण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ अभिनेत्री दीपिका पदुकोणचेही नाव समोर आले आहेत . दीपिका आणि तिची मॅनेजर करिष्मा प्रकाश यांचा एक चॅट सध्या व्हायरल होत आहे. हे चॅट जवळपास तीन वर्षे जुनं असल्याचं म्हटले जात आहे.

इतकेच नाही तर अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिचे नाव या प्रकरणात समोर आलं आहे. त्यामुळे चौकशीसाठी नम्रता शिरोडकरला बोलावण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नम्रताने दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबू याच्यासोबत विवाह केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती चित्रपटसृष्टीत फार सक्रिया नाही.

सध्या बॉलिवूडची स्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण हीचं नाव देखील या तपासात समोर आलं आहे. सगळ्यात आधी करिश्माची चौकशी करण्यात येईल त्यानंतर गरज पडल्यास दीपिकाला समन्स बजावण्यात येईल असं NCB नं म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER