आणखी एका अभिनेत्रीला झाली कोरोनाची लागण

एकीकडे कोरोनाग्रस्तांची (Corona) संख्या कमी होत असतानाच दुसरीकडे बॉलिवुडमधील (Bollywood) कलाकारांमध्ये मात्र कोरोनाची लागण होत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या एक-दीड महिन्यात अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरेही झाले आहेत. एखादा कलाकार कोरोनातून बरा होतो की नाही तोपर्यंत दुसऱ्या कलाकाराला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. आता वरुण धवनच्या ऑक्टोबर सिनेमाची अभिनेत्री बनिता संधूला (Banita Sandhu_ कोरोनाची लागण झाली आहे.

बनिता संधू ही जन्माने ब्रिटिश असून ती बॉलिवुडमध्ये नायिका म्हणून काम करण्यासाठी भारतात आलेली आहे. वरुण धवनसोबतच्या ऑक्टोबर सिनेमाने तिने बॉलिवुडमध्ये प्रवेश केला होता. 20 डिसेंबरपासून बनता कोलकाता येथे कविता अँड टेरेसा या सिनेमाचे शूटिंग करीत आहे. या शूटिंसाठी ती लंडनहून आलेली आहे. लंडनहून येणाऱ्या प्रवाशांची माहिती घेतली असता बनिताच्या शेजारी बसलेल्या प्रवाशाला नव्या कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर बनिताचीही टेस्ट करण्यात आली असता तिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर तिला कोलकाता येथील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र बनिताने सरकारी हॉस्पिटलमध्ये जाणार नाही असा पवित्रा घेतला आणि तिने अॅम्ब्युलन्समधून उतरण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर तिने पळून जाण्याचाही प्रयत्न केला. जवळ जवळ 4 तास हा प्रकार सुरु होता.

त्यानंतर पोलिसांनी ब्रिटिश उच्चायुक्तांशी संपर्क केला आणि उच्यायुक्त, पोलिसांच्या मदतीने बनिताला खाजगी बॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER