अभिनेत्री असीनची मुलगी झाली तीन वर्षांची

Asin - Rahul Sharma

‘गजनी’ (Ghajini) चित्रपटातून आमिरच्या नायिकेच्या रुपात प्रेक्षकांसमोर आलेल्या असीनने (Asin) प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. परंतु काही चित्रपट केल्यानंतर असीनने 2016 मध्ये उद्योगपती राहुल शर्मासोबत (Rahul Sharma) लग्न केले आणि चित्रपटसृष्टीला रामराम केला. असीन संसारात मग्न असून तिला एक मुलगी आहे. असीनच्या मुलीचा तिसरा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. असीनने मुलीच्या वाढदिवसाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून मुलीच्या नावाचा अर्थ सांगितला. फोटोत असीनची मुलगी खूप गोड दिसत आहे.

असीनने आपल्या इस्टाग्रामवर मुलीच्या वाढदिवसाचा फोटो टाकत लिहिले आहे, ती आता तीन वर्षांची झाली आहे. तिचे अरीन राइन ठेवण्यात आले आहे. अरीन तिचे नाव असून राइन हे तिचे आडनाव आहे. राहुलच्या आणि माझ्या आडनावाचे कॉम्बिनेशन करून आम्ही तिला नवीन आडनाव दिले आहे. या नावामुळे धर्म, जात तसेच पितृसत्ताक पद्धतीत वडिलांचेच आडनाव लावावे यापासून ती मुक्त झाली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER