अभिनेत्री आणि खासदार ‘किरण खेर’ यांना ‘ब्लड कॅन्सर’; मुंबईत उपचार सुरू

Maharashtra Today

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील बॉलिवूड (Bollywood news) अभिनेत्री आणि चंदीगडच्या भाजपा खासदार किरण खेर (Kiran Kher) यांना ब्लड कॅन्सर (Blood Cancer) झाला आहे. सध्या मुंबईत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. किरण खेर या चंदीगड येथील भाजपच्या खासदार आहेत. ३१ मार्चला किरण खेर यांच्या अनुपस्थितीबाबत काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नावर भाजप प्रदेशाध्यक्ष अरुण सूद यांनी उत्तर दिले. दरम्यान त्यांनी किरण यांना ब्लड कॅन्सर असल्याचेही सांगितले. हे ऐकून चाहत्यांना धक्का बसला.

किरण खेर यांना मल्टीपल मायलोमा आहे, हा एक प्रकारचा रक्ताचा क्षयरोग आहे. सध्या यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबद्दल अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी अधिकृत माहीती दिलेली नाही. बुधवारी ३१ मार्चला घेण्यात आलेल्या विशेष पत्रकार परिषदेत अरुण सूद म्हणाले की, बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार किरण खेर यांना मागील वर्षीच या आजाराबद्दल माहीत झाले. उपचारानंतर त्या ठीक होत आहेत. पुढचे काही दिवस त्या शहरात येऊ शकत नाहीत. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अरुण सूद यांनी सांगितले.

अभिनेत्री किरण खेर यांनी १९९० साली सरदारी बेगम या श्याम बेनेगल यांच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. इतकेच नव्हे, तर ‘बैरीवाली’ या बंगाली चित्रपटासाठी किरण खेर यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button