अमृताराव बनणार आहे आई, बेबी बंपसह समोर आला पहिला फोटो

Actress Amrita Rao Is Pregnant With FIRST Child.jpg

बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव (Amrita Rao) आई होणार आहे. अलीकडेच तिला नवरा आरजे अनमोलसोबत खार येथील क्लिनिकच्या बाहेर स्पॉट केल्या गेले होते. अमृताचे एक फोटोही समोर आले आहे, ज्यामध्ये तिचे बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. डॉक्टरांच्या क्लिनिक भेटीदरम्यान हा फोटो काढण्यात आले आहे.

एका सूत्राने सांगितले की, अमृता आपल्या आयुष्यातील या काळाचा खूप आनंद घेत आहे. बहुतेक लोकांना तिच्या गर्भधारणेबद्दल माहिती नाही आहे. केवळ या जोडप्याच्या जवळच्यांनाच याबद्दल माहिती आहे. लॉकडाउनपूर्वी ती गरोदर झाली होती आणि ति खूप आनंदी आहे. अमृता आणि अनमोल दोघेही अत्यंत खासगी आयुष्य जगतात.

सांगण्यात येते की अमृता आणि अनमोलने ७ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१६ मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाला कुटुंब आणि फक्त जवळचे मित्र उपस्थित होते.

अमृताच्या व्यावसायिक जीवनाबद्दल बोलताना तिने ‘अब के बरस’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट वर्ष २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटात तिने आर्या बब्बरसोबत काम केले होते. याशिवाय अमृताने अनेक दक्षिण चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘इश्क-विश्क’ आणि ‘विवाह’ मध्ये अमृता राव आणि शाहिद कपूरची केमिस्ट्री चांगलीच पसंत केल्या गेली होती.

विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकमध्ये अमृता दिसली होती. या चित्रपटात अमृताने बाल ठाकरे यांची पत्नी मीना ठाकरे यांची भूमिका साकारली होती. चित्रपटात तिने नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER