ऐश्वर्या, कैटरीनासह या अभिनेत्रींनी केले आहे सलमान खानला डेट; ब्रेकअप होण्यामागचे कारण काय?

Actress

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आज ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने सेलिब्रेटी आणि चाहते त्याला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. ५५ व्या वर्षीदेखील सलमान खान (Salman Khan) बॅचलर आहे; परंतु त्याच्या मैत्रिणींची नेहमीच चर्चा असते. ऐश्वर्या राय आणि कैटरीना कैफ यांच्यासह अनेक अभिनेत्रींनी सलमान खानला डेट केले आहे; पण त्याचे कोणाशीही आयुष्यभर संबंध प्रस्थापित होऊ शकले नाहीत.

ऐश्वर्या राय (Aishwarya Rai)

‘हम दिल दे चुके है सनम’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकमेकांच्या जवळ आले होते. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. ऐश्वर्याचे आई-वडील तिच्या सलमानबरोबरच्या रिलेशनशिपच्या विरोधात होते. ऐश्वर्यासोबत लग्न करण्याची सलमानची इच्छा होती; पण तसे होऊ शकलेनाही. या रिलेशनशिपच्या दरम्यान सलमान खान आपली एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीला भेटायला अमेरिकेत गेला आणि जेव्हा ऐश्वर्या राय हिला हे कळले तेव्हा ती रागावली. त्या दोघांचे भांडण सुरू झाले. तथापि, त्या दिवसांत ऐश्वर्या तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात होती आणि तिला लग्न करायचं नव्हतं. असेही म्हटले जाते की, ऐश्वर्याने सलमानवर अत्याचार केल्याचा आरोपदेखील केला होता. त्यानंतर दोघे २०१२ मध्ये विभक्त झाले.

कैटरीना कैफ (Katrina Kaif)

सलमान खानसोबत कैटरीना कैफचे अफेअर कोणापासून लपलेले नाही. सलमानने कैटरिना कैफला ‘मैंने प्यार क्यों किया’ या चित्रपटापासून लाँच केले. दोघे एकमेकांच्या खूप जवळचे झाले होते; पण या दरम्यान रणबीर कपूरबरोबर कैटरिना कैफची वाढती जवळीक सलमान खानला आवडली नाही आणि त्यांचे ब्रेकअप झाले. तथापि, ब्रेकअपनंतरही सलमान खान आणि कैटरीना कैफने बर्‍याच चित्रपटांत एकत्र काम केले आहे.

संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani)

संगीता बिजलानीशी सलमानच्या रिलेशनशिपची बातमी खूप चर्चेत आली. सलमानने संगीताशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नाची कार्डे छापली गेली होती; पण सलमानने लग्नाच्या काही दिवस आधी नकार दिला होता. त्यानंतर संगीताने क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न केले. जरी वेगळे असले तरी संगीता आणि सलमान खान चांगले मित्र आहेत. संगीता सलमानच्या घरीही येणे-जाणे करते.

 

सोमी अली (Somi Ali)

सोमी अलीनेदेखील सलमान खानला डेट केले आहे. सांगण्यात येते की, ९०च्या दशकात हे दोघे प्रेमात पडले होते; परंतु सलमान खानच्या निकृष्ट वृत्तीमुळे सोमी अलीने त्याच्याशी ब्रेकअप केले.

युलिया वंतूर (Yulia Vantur)

रोमानियन मॉडेल युलिया वंतूरशीदेखील सलमान खानचे नाव जोडले गेले आहे. युलिया सलमानच्या कुटुंबाच्या अगदी जवळची आहे. ती अनेकदा सलमानच्या फॅमिली फंक्शनमध्ये दिसते. लॉकडाऊन दरम्यान युलिया सलमान खानच्या फार्महाऊसमध्ये थांबली होती. तथापि, सलमान युलियाबरोबरच्या त्याच्या संबंधाबद्दल कधीही उघडपणे बोलला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

 

View this post on Instagram

 

A post shared by krazyshopping (@krazshop)

 

View this post on Instagram

 

A post shared by Iulia Vantur Fan Page (@iulia.vantur)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER