म्हणून हे कलाकार पार्ट्यांना जात नाहीत

Akshay Kumar - John Abraham

बॉलिवूडमध्ये (Bollywood) गेल्या काही वर्षांपासून रात्री दिल्या जाणाऱ्या पार्ट्या फार कमी झाल्या आहेत. अगदीच एखादा निर्माता किंवा दिग्दर्शक आपल्या जवळच्या मित्रांसाठी पार्टीचे आयोजन करतो. मी तुम्हाला जे सांगतोय त्या पार्ट्या सुशांत प्रकरणात पुढे आलेल्या ड्रग्ज पार्ट्या नसून दारुच्या पार्ट्या आहेत. 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये आठवड्याला दोन-तीन पार्ट्या असायच्याच. यात दारुचा महापूर वहायचा आणि बॉलिवूडचे बहुतेक सगळे कलाकार या पार्ट्यांना हजेरी लावायचे. याचे कारण पार्ट्यांमध्ये भेटीगाठी व्हायच्या आणि पुढील चित्रपटाबाबत चर्चाही व्हायची.

त्या काळात जॅकी श्रॉफ, गोविंदा, अक्षयकुमार, अजय देवगन, सनी देओल, अनिल कपूर असे अनेक सुपरहिट नायक होते. त्यामुळे पार्ट्यांना गेले की यापैकी काही जणांशी भेटी व्हायच्या. मात्र अक्षय कुमार, अजय देवगन आणि सनी देओल मात्र फार क्वचित पार्ट्यांना दिसत असत. त्यांना भेटायचे असले की एक तर त्यांच्या घरी जावे लागत असे किंवा सेटवर. या तीन कलाकारांनी आवर्जून पार्ट्यांना न जाण्याचा निर्णय घेतला होता. अक्षयकुमारला सुरुवातीपासूनच दारू आणि सिगरेटचे वावडे आहे. त्याने एका सिगारेटची जाहिरात केली होती खरी पण तो स्वतः या दोन्ही गोष्टींपासूनच दूर आहे. तसेच त्याला रात्री लवकर झोपण्याची सवय असल्याने तो रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांना जात नसे. स्वतःच्या चित्रपटाची पार्टी असली तरी तो लवकर यायचा, भेटायचा आणि साडे नऊ, दहाला निघून जायचा. त्या काळात पार्टीची वेळ सातची असली तरी ती साडे नऊ दहाला सुरु व्हायची आणि रात्री एक दीडपर्यंत चालायची. मात्र अक्षय कधीही असा उशिरापर्यंत पार्ट्यांना थांबत नसे. सकाळी उठून तो जुहू बीचवर व्यायाम करायला जात असे. आता मात्र तो घरातच व्यायाम करतो असे सांगितले जाते.

अक्षयप्रमाणेच (Akshay Kumar) सनी देओलला (Sunny Deol) दारु आणि सिगरेटचे व्यसन नाही. विशेष म्हणजे घरात लहानपणापासूनच फिल्मी वातावरण असताना आणि पिता धर्मेंद्र दारू पिण्याचा शौकीन असताना, घरात उंची विदेशी मद्य असतानाही सनीला कधी दारु प्यावीशी वाटली नाही. सुरुवातीला सनी देओल काही पार्ट्यांना उपस्थित राहात असे. दामिनीच्या पार्टीला तो सुरुवातीपासून उपस्थित होता. परंतु नंतर पार्ट्यांमध्ये दारू पिऊन होत असलेला हंगामा पाहून त्याने पार्ट्यांना जाणे बंद केले. एकदा मुलाखतीत त्याने सांगितले, पार्ट्यांमध्ये दारु पिऊन लोकं झिंगतात आणि काहीही बडबड करायला सुरुवात करतात. एकमेकांची उणीधुणी काढतात. त्यांच्याशी काय बोलावे असा मला प्रश्न पडतो म्हणूनच मी पार्ट्यांना जात नाही. मी पीत नसलो तरी मित्रांना मी पार्टी देतो तीही खाजगीत असेही सनीने सांगितले होते.

Ajay Devgn on Twitter: "I lost my brother Anil Devgan last night. His  untimely demise has left our family heartbroken. ADFF & I will miss his  presence dearly. Pray for his soul.अजय देवगन दारु आणि सिगरेटचा आस्वाद घेत असला तरी ही पार्ट्यांना जात नाही. दारु प्यायची असेल तर तो खास मित्रांच्या सोबतीतच पितो. पार्ट्यांना जाऊन सगळ्यांसमोर दारु पिणे त्याला आवडत नाही. तसेच पार्ट्यांमध्ये होणाऱ्या गॉसिपमध्येही त्याला इंटरेस्ट नसल्याने पार्ट्यांना जाणे म्हणजे वेळ वाया घालवणे असे त्याला वाटते. खाजगीत बसून पार्टी करणे त्याला जास्त आवडते. अक्षयप्रमाणेच अजयही रात्री दहाच्या आत घरी जाऊन कुटुंबासमवेत वेळ घालवण्याला जास्त पसंती देतो.

Manoj Bajpayee: I've always wanted to play Devdas | Hindi Movie News -  Times of Indiaमनोज वाजपेयीसुद्धा फार कमी पार्ट्यांना उपस्थित असतो. मनोजलाही गॉसिपिंग आवडत नसल्याने आणि पार्ट्यांमध्ये होणाऱ्या गदारोळापासून दूर राहणे आवडते.

अमिताभ बच्चनही दारु आणि सिगरेटच्या व्यसनापासून दूर आहेत. चित्रपटात जरी ते सिगरेट आणि दारु पीत असले तरी वास्तव जीवनात मात्र त्यांनी याला हात लावलेला नाही. असे असले तरी पार्ट्यांना मात्र ते उपस्थित असतात. पार्टीची जी वेळ ठरलेली असते त्या वेळेला ते उपस्थित होतात आणि एक-दीड तासानंतर निघूनही जातात. त्यांनाही उशिरापर्यंत पार्ट्यांमध्ये राहाणे आवडत नाही. सकाळी लवकर उठून व्यायाम करायला जात असल्याने रात्री ते वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करतात.

जॉन अब्राहमही दारु आणि सिगरेटपासून दूर असल्याने तोसुद्धा पार्ट्यांपासून दूर राहाणेच पसंत करतो. जॉनने एकदा सांगितले होते, पार्टीला गेल्यानंतर मला फार ऑकवर्ड वाटते. कोणाशी काय बोलायचे तेच समजत नाही. काही जण दारु पिऊन झिंगलेले असतात. मला कोणाला भेटायचे असेल तर मी त्याच्या घरी किंवा ऑफिसला जाऊन भेटतो असेही जॉन म्हणाला होता.

गेल्या काही वर्षात मात्र सार्वजनिक पार्ट्यांची संख्या कमी झाल्याने अनेक पार्टीप्रेमी कलाकार स्वतःच खाजगी पार्ट्यांचे आयोजन करतात आणि आनंद लुटतात. वरील कलाकार मात्र तेव्हाही पार्ट्यांपासून दूर होते आणि आजही आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER