पडद्यावर चुंबनदृश्य करण्यास नकार देणारे कलाकार

पडद्यावर चुंबनदृश्य करण्यास नकार देणारे कलाकार

नायक-नायिकांमधील प्रेम खरे वाटावे यासाठी त्यांच्याकडून चुंबनदृश्य निर्माते आणि दिग्दर्शक करवून घेतात. काही नायक-नायिका यासाठी तयारही होतात. पण अनेकदा नायक किंवा नायिका सहकलाकार कोण आहे यावरही चुंबनदृश्य द्यायचे की नाही हे ठरवतात. तर काही नायक-नायिकांनी पडद्यावर कधीही चुंबन दृश्य द्यायचे नाही असे ठरवले असून ते आजही यावर कायम आहेत.

Did you know Salman Khan flirted with Bhagyashree during the shoot of  'Maine Pyar Kiya'? | Hindi Movie News - Times of Indiaसलमान खान (Salman Khan) बॉलिवूडचा (Bollywood) दबंग स्टार आहे. त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले असून जवळ जवळ सर्वच नव्या जुन्या नायिकांनी त्याच्यासोबत काम केलेले आहे. त्याच्यासोबत काम करण्यास सगळ्याच नायिका एका पायावर तयार असतात. एवढेच नव्हे तर त्याच्यासोबत चित्रपटात चुंबनदृश्य असेल तर तेही करण्यास तयार असतात. पण सलमान खानने मैंने प्यार किया चित्रपटापासूनच नायिकेचे चुंबन न घेण्याचा निर्णय घेतला असून तो आजही आपल्या या निर्णयावर कायम आहे. पडद्यावर चुंबनदृश्य का देत नाही याचे कारण स्वतः सलमाननेच एकदा सांगितले होते. राजश्री प्रॉडक्शनच्या ‘मैंने प्यार किया’मध्ये सलमान खान आणि भाग्यश्रीची जोडी होती. चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर सलमान आणि भाग्यश्रीचे फोटोशूट केले जाणार होते. फोटोग्राफरला सलमान आणि भाग्यश्रीच्या चुंबनाचा फोटो हवा होता. फोटोग्राफर सलमानकडे गेला आणि त्याने भाग्यश्रीला कळू न देता तिचे चुंबन घेतल्यास अत्यंत नैसर्गिक फोटो मिळेल असे सांगितले. तेव्हा सलमानने भाग्यश्री यासाठी तयार आहे का हे विचारण्यास त्या फोटोग्राफरला सांगितले. भाग्यश्री तयार असल्याशिवाय आपण चुंबनदृश्य देणार नाही असे त्याने स्पष्टपणे त्या फोटोग्राफरला सांगितले. फोटोग्राफरने जेव्हा भाग्यश्रीला जाऊन ही गोष्ट सांगितली तेव्हा आपण एका सुरक्षित नायकासोबत काम करीत आहोत याची खात्री भाग्यश्रीला पटली. फोटोशूटसाठी या दोघांनी चुंबनदृश्य दिले नसले तरी त्यांच्या पडद्यावरील केमिस्ट्रीत तसूभरही फरक पडला नव्हता. सूरज बडजात्याने चित्रपटात या दोघांवर एक चुंबनदृश्य चित्रित केले पण ते काच मध्ये ठेऊन. अत्यंत कलात्मक असे ते चुंबनदृश्य होते.

सलमान खानप्रमाणेच सोनाक्षी सिन्हानेही (Sonakshi Sinha) पडद्यावर कधीही चुंबनदृश्य न देण्याचा निर्णय घेतलेला आहे. सोनाक्षीने सलमान खानची नायिका म्हणून दबंग चित्रपटातून रुपेरी पडद्यावर आगमन केले होते. सोनाक्षीने पडद्यावर अंगप्रदर्शन आणि चुंबनदृश्य न देण्याचा निर्णय अगोदरच घेतला होता. पिता शत्रुघ्न सिन्हाला हे आवडत नाही असे सोनाक्षीने सांगितले होते. दुसरे एक कारण म्हणजो सोनाक्षी थोडी जाड असल्याने अंग प्रदर्शन तिला शोभणारेही नव्हते. आता मात्र सोनाक्षी चांगलीच बारीक झाली आहे. सोनाक्षीने लुटेरा चित्रपटात रणवीर सिंहबरोबर एक अत्यंत रोमँटिक दृश्य दिले होते. त्यानंतर मात्र तिने कधीही कोणत्याही चित्रपटात चुंबनदृश्य तर सोडा तशा प्रकारचे दृश्य दिलेले नाही.

Guzarish (Full Song) Ghajini feat. Aamir Khan | Latest bollywood songs,  Aamir khan, Songsदक्षिणेतील प्रख्यात अभिनेत्री आसीननेही पडद्यावर चुंबनदृश्य न देण्याचा निर्णय घेतलेला होता. सगळ्या खानांमध्ये आमिर खानने आतापर्यंत पडद्यावर सगळ्यात जास्त चुंबनदृश्ये दिलेली आहेत. आसीनने आमिर खानसोबत (Aamir Khan) गजनी चित्रपट केला होता. या चित्रपटात आमिर आणि आसीनवर एक चुंबनदृश्य चित्रित करण्याचा विचार दिग्दर्शकाने केला होता. पण आसीनने (Asin) याला स्पष्टपणे नकार दिला होता. आसीनने नकार दिल्याने त्या दृश्यात बदल करण्यात आला होता. चुंबन न देण्याच्या निर्णयामुळे आसीनला अनेक चित्रपटांवर पाणी सोडावे लागले होेते.

Aishwarya Rai Bachchan and Ranbir Kapoor in a sizzling photoshoot for  Filmfare. #Bollywood #Fashion #Style #Be… | Bollywood actors, Aishwarya rai,  Bollywood couplesएकीकडे असे कलाकार आहेत तर दुसरीकडे चुंबनदृश्य देण्यात अग्रेसर असताही काही नायिकांनी नायक पाहून चुंबन न देण्याचा निर्णय घेतला होता. करन जोहरच्या ऐ दिल है मुश्किल चित्रपटात ऐश्वर्या रणबीर कपूरची नायिका होती. चित्रपटात या दोघांचे एक चुंबनदृश्य होते. मात्र ऐश्वर्याने (Aishwarya Rai) रणबीरसोबत (Ranbir Kapoor) चुंबनदृश्य देणार नाही असा पवित्रा घेतल्याने ते दृश्य चित्रित झाले नाही.

प्रियांका चोप्रानेही (Priyanka Chopra) सात खून माफ चित्रपटामध्ये अन्नू कपूरबरोबर चुंबनदृश्य देण्यास नकार दिला होता. खरे तर ती चित्रपटाची गरज होती. अन्नू कपूरबरोबर चुंबनदृश्य करणार नाही यावर प्रियांका ठाम राहिली. त्यामुळे चित्रपटाच्या कथेतून ते दृश्य काढून टाकण्यात आले.

Kareena Kapoor refuses to be intimate with Ajay Devgnकरीना कपूरने (Kareena Kapoor) अनेकांबरोबर चुंबनदृश्ये केली असली तरी अजय देवगनबरोबर मात्र चुंबनदृश्य देण्यास तिने नकार दिला होता. खरे तर या दोघांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. दोघांची केमिस्ट्रीही चांगली आहे तरीही करीनाने अजयला पडद्यावर चुंबन देण्यास नकार दिला होका. प्रकाश झा यांच्या सत्यागह चित्रपटात या दोघांवर चुंबनदृश्य चित्रित केले जाणार होते. पण अजयच्या तोंडाला सिगरेटचा वास येतो असे सांगत करीनाने चुंबनदृश्य देण्यास नकार दिला होता. त्यामुळे चित्रपटातून ते दृश्य काढून टाकण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER