अभिनेता सुबोध भावे करतोय त्याचे ट्विटर अकाउंट डिलीट; कारण अद्यापही अस्पष्ट

Subodh Bhave Twitter

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) त्याचे ट्विटर अकाउंट डिलीट करत आहे. याबाबतच अधिकृत घोषणा त्याने स्वतः ट्विटर पोस्टच्या माध्यमातून केली आहे.

मात्र ट्विटरच्या माध्यमातून इतका अ‌ॅक्टिव्ह असणारा सुबोध भावे अचानक अकाउंट डिलीट का करत आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांना नक्कीच पडला आहे .सुबोधने ट्विट करत म्हटले की, “आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळाले त्याबद्दल धन्यवाद. मी माझं ट्विटर अकाउंट डिलीट करतो आहे. काळजी घ्या, मस्त राहा. जय महाराष्ट्र, जय हिंद.” दरम्यान एकूणच वाढत्या नकारात्मकतेमुळे हे अकाउंट तो डिलीट करत असल्याचे समजते. मात्र नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER