अभिनेता सोनू सूद शरद पवारांच्या भेटीला

Sharad Pawar - Sonu Sood

मुंबई : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सोनू सूदनं भेट घेतली आहे. शरद पवार आणि सोनू सूद यांच्या भेटीबद्दल सविस्तर माहिती समोर आलेली नसून ही सदिच्छा भेट असल्याचे समोर आले आहे . सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने जूहू पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमुळे चर्चेत आला होता.

दरम्यान मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) अनधिकृत बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूदविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सोनू सूद याच्या जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले, असा आक्षेप नोंदवला पालिकेने नोंदवला होता. सोनू सूदनं यानंतर मुंबई उच्च न्यायालयात बीएमसीच्या नोटीसला अभिनेता सोनू सूदने आव्हान दिले होते. उच्च न्यायालयानं (Bombay High Court) मुंबई महापालिकेला 13 जानेवारीपर्यंत सोनू सूद विरोधात काहीही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सोनू सूदच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची देखील सोनू सूदनं यापूर्वी भेट घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER