अभिनेता सोनू सूद याला हायकोर्टातही दिलासा नाही

  • बेकायदा बांधकामाबद्दल पालिकेची कारवाई

मुंबई :- जूहू येथील आपल्या राहत्या इमारतीमध्ये बेकायदा फेरबदल आणि बांधकाम केल्याबद्दल कारवाई करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटिशाला अंतरिम स्थगिती मिळविण्यासाठी अभिनेता सोनू सूद याने केलेले अपील मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court)गुरुवारी  फेटाळले.

मगर दिवाणी न्यायालयाने अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर सूद याने हे अपील केले होते. ते न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी फेटाळले. त्यामुळे आधी दिलेला तातापुरता मनाई हुकूम रद्द झाल्याने कारवाई करण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

जुहू येथील ‘शक्तिसागर’ या सहा मजली निवारी इमारतीच्या संदर्भात महापालिकेने महाराष्ट्र नगररचना कायद्याच्या कलम ५३ अन्वये सोनू सूद यास गेल्या ऑक्टोबरमध्ये ही नोटीस बजावून इमारतीत केलेले बेकायदा फेरबदल व बांधकाम पाडून टाकण्यास सांगितले होते. सूद त्या इमारतीत फेरबदल करून तेथे हॉटेल बनवू पाहात आहे व त्यासंदर्भात त्याच्याविरुद्ध यापार्वीही अशीच कारवाई करण्यात आली होती, असे महापालिकेचे म्हणणे होते.

महापालिकेचे ज्येषठ वकील अनिल साखरे यांनी न्यायालयास असे सांगितले होते की, यापूर्वी सूद याने संबंधित अधिकाºयांकडून परवानगी न घेता इमारतीत केलेले फेरबदल व जास्तीचे बांधकाम पाडल्यानंतरही सूद त्याने ते पुन्हा करण्यास सुरुवात केली आहे. शिवाय स्वत: सोनू सूद किंवा त्याची पत्नी सोनाली यांच्याकडे त्या इमारतीच्या मालकीची कागदपत्रेही नाहीत, असाही महापालिकेचा दावा आहे.

याचे खंडन करताना सूद याचे वकील अ‍ॅड. अमोघ सिंग यांनी असे म्हणणे मांडले होते की, सूद याने इमारतीत जे फेरबदल किंवा बांधकाम केले आहे ते नगररचा कायद्यानुसारच असून त्यासाठी महापालिकेची पूर्व परवानगी घेण्याची मुळात गरजच नव्हती.

ही बातमी पण वाचा : अपमानित झालेली अभिनेत्री आमदार.. सभागृहात परतली ती मुख्यमंत्री होऊनच..!

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER