
मुंबई :- देशात कोरोनाच्या संकटात काल ईद साजरी करण्यात आली. ईदच्या दिवशी कुणीही उपाशी राहू नये. यासाठी अभिनेता सलमान खान याने पाच हजार कुटुंबांना अन्नदान केले. अन्नाची पाकिटे या पाच हजार कुटुंबांपर्यंत पोहचवली असून तो सध्या पनवेल येथील आपल्या फार्महाऊसवर आहे.
लॉकडाऊनमुळे मजुरांचा रोजगार गेल्याने ते संकटात सापडले आहेत. तेव्हा त्यांना आपल्यापरीने सलमान खान मदत करत आहे. त्याने आतापर्यंत अनेकांना मदत करताना त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले आहेत. त्यानंतर त्याने ईदनिमित्त पाच हजार गरजू कुटुंबांना अन्नाची पाकिटे पाठवली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला