अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीच्या पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज

Actor Nawazuddin Siddiquis wife aaliya files for divorce

मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया हिने त्याला घटस्फोटासाठी नोटीस पाठविली आहे. तिने पोटगीचीही मागणी केली आहे.

नवाजुद्दीन सिद्दिकी याची पत्नी आलिया हिने आपल्या वकिलामार्फत ही घटस्फोटाची नोटीस ई-मेलद्वारे आणि व्हाट्सअद्वारे तसेच स्पीड पोस्टद्वारे नवाजुद्दीन सिद्दिकीला पाठवली आहे. दहा वर्षांच्या वैवाहिक जीवनात आता अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून आता हे संबंध पुढे टिकविणे अशक्य असल्याचे आलिया हिने आपल्या घटस्फोटाच्या नोटिशीत म्हटले आहे. तसेच तिने घटस्फोटाची आणि पोटगीची मागणी केली आहे.

टाइम्स समूहाच्या एका वृत्तपत्राशी बोलताना आलिया हिच्या वकिलाने घटस्फोटाची बातमी जगजाहीर केली आहे. आलियाच्या वकीलांनी सांगितले की, या घटस्फोटाच्या नोटीसमधील काही गोष्टी गंभीर स्वरूपाच्या आणि संवेदनशील असून त्या उघड करता येणार नाही. आम्ही नवाजुद्दीन सिद्दिकीला घटस्फोटाची नोटीस पाठविली असली तरी नवाजुद्दीनकडून त्याला कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया यांच्या लग्नाला दहा वर्ष झाली असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून या विवाहात गंभीर समस्या निर्माण झाल्या होत्या. आलिया आणि नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या संबंधांमध्ये नवाजुद्दीन आणि त्याच्या भावामुळे समस्या निर्माण झाल्याचे आलियाच्या वकिलांनी सांगितले.

दरम्यान सध्या नवाजुद्दीन सिद्दीकी हा उत्तर प्रदेशातील त्याच्या बुधन गावी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 25 मेपर्यंत होम क्वारंटाईन आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला