शिवसेनेच्या विरोधात कंगनाचे आणखी एक पाऊल ; राज्यपाल कोश्यारींची आज घेणार भेट

Kangana Ranaut-Bhagat Singh Koshyari

मुंबई :  शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वक्त्यव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर कंगना राणौत सायंकाळी साडेचार वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांची भेट घेणार आहे. राजभवन  (Rajbhavan)इथे ही भेट होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

कंगना विरूद्ध शिवसेना सामना रंगला असतानाच कंगना राज्यपाल यांची भेट घेत असल्यामुळे राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजॉय मेहता यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कंगना रनौत प्रकरणाची अयोग्य पद्धतीने हाताळणी केली, अशी प्रतिक्रिया राज्यपालांनी दिली होती.

ही बातमी पण वाचा :  उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे यापुढे अयोध्येत स्वागत नाही; संत-महंतांचे कंगनाला समर्थन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER