… म्हणून आम्ही मोदींच्या सोबत; अभिनेता गजेंद्र चौहानचा मोदीविरोधकांना टोमणा

Gajendra Chouhan scolds anti-Modi

मुंबई : करोनाच्या (Corona virus) दुसऱ्या लाटेत निर्माण झालेल्या अव्यवस्थेबाबत अनेकांनी सोशल नेटवर्किंगवर राग व्यक्त केला. सया परिस्थितीसाठी सरकारी धोऱणे जबाबदार असल्याचे सांगत सोशल नेटवर्किंगवरुन सरकावर टीका केली. आरोप प्रत्यारोपांमध्ये अभिनेते आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटचे (एफटीआयआय) माजी अध्यक्ष गजेंद्र चौहान (Gajendra Chouhan) यांनीही उडी घेतली. चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Modi) उल्लेख करत ट्विट केले – “गाय आपल्या मालकावर नाराज असली तरी ती रुसून खाटीकाच्या घरी जात नाही. त्यामुळेच आम्ही मोदींसोबतच आहोत.” चौहान यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. मोदींच्या विरोधकांना हे ट्विट चांगलेच झोम्बले आहे.

काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद यांनी – गाय आपली माता असते. त्यांचं मालिक कोण असू शकते?” असा प्रश्न विचारला. अभिनेता कमला राशिद खान म्हणजेच केआरकेने, “भाईजान, मात्र तुम्ही मोंदींवर नाराज का आहात? त्यांनी असे काय चुकीचे काम केले आहे?” असा प्रश्न विचारला आहे.

जीनत नावाच्या युझरने, “तुम्ही मोदींसोबत आहात हा तुमचा भ्रम आहे. खरे तर मोदींचे त्यांच्या पदावर प्रेम आहे आणि तुम्हाला भविष्याची चिंता आहे. तुम्ही जनतेला गाय म्हणत आहात तर खाटीक कोण आहे, हे स्पष्ट करा. लोक इथे तडफडत मरत आहेत हे तुम्हाला फार महत्वाचे वाटत नाही का? हे तुमच्या भविष्यासाठी ग्रहण ठरणार लक्षात ठेवा.”

शिल्पी नावाच्या महिला युझरने, “तुम्ही अंधभक्त आहात. तुमचे हिंदू सम्राट हिंदूंची रक्षा नाही करू शकले नाहीत,” असा टोमणा मारला. देव प्रकाश नावाच्या व्यक्तीने, “गाय मालकावर नाराज का असेल? तिला खायला मिळाले नाही का? औषढे मिळाली नाहीत का? त्याशिवाय तिचा मृत्यू झाला तर?”, असा प्रश्न विचारला आहे.

चौहान यांचे हे ट्विट दोन हजार ६०० हून अधिक रिट्विट झाले आहे. १२ हजार जणांनी ते लाईक केले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button