अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण

Arjun Kapoor

मुंबई : राज्यात कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे. बॉलिवूडलाही कोरोनाने विळखा घातला आहे. अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वतः सोशल मीडियावर याची माहिती दिली.

अर्जुनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘मला कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती तुम्हाला देणं हे माझं कर्तव्य आहे. मी स्वतःला घरी क्वारंटाईन करून घेतलं आहे. तुम्ही सर्वांनी जो मला पाठिंबा दिला त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. मी वेळोवेळी तुम्हाला हेल्थ अपडेट देत राहीन.’

दरम्यान अर्जुनच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्याला लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा दिल्या. अर्जुन त्याच्या आगामी सिनेमाचं शूटिंग फिल्मसिटीमध्ये करत होता. या सिनेमात त्याच्यासोबत रकुलप्रीत सिंग आणि नीना गुप्ताही काम करत असल्याची माहिती आहे.

 

View this post on Instagram

 

🙏🏽

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on


 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER