खासदार नुसरत जहाँ यांचा पतीसोबतचा रोमँटिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : खासदार झाल्यानंतर टर्कीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केल्यानं चर्चेत आलेल्या नुसरत जहाँ यांचा पती निखिल जैनसोबतच बेडरुममधील एक रोमँटिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ नुसरत यांच्या एका फॅनपेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये नुसरत आणि त्यांचा पती निखिल ‘हे शोना…’ या गाण्यावर अ‍ॅक्ट करताना दिसत आहेत. या टिक टॉक व्हिडीओमधील दोघांची केमिस्ट्री सर्वांच्या पसंतीत उतरत असून आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. निखिल आणि नुसरत नेहमीच असे रोमँटिक व्हिडीओ शेअर करत असतात.

दरम्यान निखिल जैनशी लग्न केल्यानंतर नुसरत यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. निखिल हिंदू तर नुसरत मुस्लिम असल्याने मुस्लिम धर्मगुरुंनी या लग्नाविरोधात फतवा काढला होता. तसेच भांग भरून संसदेत गेल्यानेही नुसतर यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती. या सर्व टीकेला उत्तर देताना, ‘मी दोन्ही धर्मांचा पुरेपूर आदर करते’ असे नुसरत म्हणाल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

@nusratchirps love @nikhiljainoffcl #njrocks⚡⚡⚡⚡ #thenjaffair #lifeline💕 #tiktok

A post shared by Nusrat jahan fan (@nusrat.jahan.fan) on

nbsp;