अभिनेता आमिर खान कोरोना पॉझिटिव्ह; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत लावली होती कार्यक्रमाला हजेरी

Aamir Khan - Corona Positive - Maharashtra Today

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आमिर खानला (Aamir Khan) कोरोनाचा (Corona) संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आमिर खान क्वारंटाइन झाला असून, त्याच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आमिर खानने दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत ‘वर्षा’वरील कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

आमिर खानला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तो आता होम क्वारंटाइनमध्ये असून, त्याची प्रकृती उत्तम आहे. तसेच सर्व नियमांचं पालन करत आहे. आमिर खानच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी करून घ्यावी, असे आमिरच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासात कोरोनाचा शिरकाव झाला असून, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सध्या उपचार घेत असून, असे असतानाच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत एका कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या आमिर खानलाही कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER