पडळकर आमदार होईपर्यंत चप्पल न घालणाऱ्या कार्यकर्त्यांचा चांदीच्या चप्पला आणि ‘पॅशन’ देऊन सत्कार

Activists who did not wear sandals till Padalkar becomes MLA

सांगली : गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आमदार होईपर्यँत चप्पल घालणार नाही, असा पण करणाऱ्या दोन कार्यकर्त्यांचा चांदीची चप्पल (silver slippers) आणि ‘पॅशन’ (Passion Bike)गाडी देऊन सत्कार करण्यात आला. एका कार्यकर्त्याच्या वारसालाही गाडी दिली.

गोपीचंद पडळकर आमदार होईपर्यंत चप्पल घालणार नाही, असा पण करणारे दत्तात्रय कटरे यांनी २००६ पासून तर नारायण पुजारी यांनी २००९ पासून चपला घातल्या नव्हत्या. या दोघांचा चांदीची चप्पल आणि पॅशन गाडी देऊन सत्कार करण्यात आला.

याचप्रमाणे गोपीचंद पडळकर आमदार होणार नाहीत, तोपर्यंत कटिंग-दाढीचे पैसे घेणार नाही, असा पण २००९ पासून जालिंदर क्षीरसागर यांनी केला होता. त्यांच्या वारसांना पॅशन गाडी प्रदान करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. गोपीचंद पडळकर व रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

गोपीचंद पडळकर

गोपीचंद पडळकर धनगर समाजाचे नेते आहेत. धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या आंदोलनाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळी त्यांनी भाजपाला रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. ‘वंचित’कडून लोकसभेची निवडणूक लढलेत. पराभव झाला.

त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी गोपीचंद पडळकर भाजपात परत आलेत. बारामतीतून भाजपाकडून विधानसभेची निवडणूक लढले.डिपॉझिट जप्त झाले. नंतर भाजपाने त्यांना आमदार म्हणून विधानपरिषदेत संधी दिली.

ही बातमी पण वाचा : सामनातून कोरोनाग्रस्त मंत्र्यांना प्रेमळ चिमटे तर, विरोधकांवरही साधला निशाणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER