कार्यकर्त्यांनी घाबरु नये, अजित पवार लवकरच महाराष्ट्राच्या सेवेत रुजू होतील – अमोल मिटकरी

Amol Mitkari-Ajit Pawar

मुंबई :-  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना कोरोनाची लागन झाली आहे. आज ते ब्रिच कॅंडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेत. अजित पवारांना कोरोना झाल्याचे कळताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन अजित पवार यांनी स्वतः सोशल मीडियावरून कार्यकर्त्यांनी काळजी करू नये असे आवाहन केले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही कार्यकर्त्यांनी काळजी करू नये असा संदेश दिला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून अजित पवार त्यांच्या घरी विलगीकरणात होते. नियमित तपासणीसाठी ते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे कार्यकर्त्यांनी घाबरुन जावू नये. लवकरच ते बरे होतील आणि महाराष्ट्राच्या सेवेत रुजू होतील, असं अमोल मिटकरी म्हणाले.

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू आहेत. ते सध्या आराम करत असल्याची माहिती अमोल मिटकरी यांनी दिली. कोरोनातून लवकर बरे होऊन अजित पवार जनता दरबार घेतील. असंही त्यांनी म्हटले.

कोरोना संसर्ग झाल्याची माहिती अजित पवार यांनी त्यांच्या ट्विटर अकांऊटवरुन दिली आहे. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी काळजी करु नये, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. प्रकृती उत्तम असून थोड्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत पुन्हा कार्यरत होईन, असं अजित पवार म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : अजित पवारांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER