
सिंधुदुर्ग : जिल्हा नियोजन बैठकीत भाजपाचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेचे (Shivsena) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यात तिलारी धरणाचा कालवा फुटल्याच्या मुद्द्यावरून बाचाबाची झाली. नंतर दोघांचे कार्यकर्ते भिडलेत. पालकमंत्री उदय सामंत यांना मध्यस्थी करून स्थिती शांत केली.
राणे-राऊत यांच्यामध्ये वाद झाल्यानंतर जिल्हापरिषद सदस्यांनी सभागृहात राडा घातला. तिलारी धरणाचा डावा कालवा फुटल्याच्या विषयावरून राऊत-राणे या नेत्यांमध्ये वाद झाल्याचे कळते.
तिलारी धरणाचा डावा कालवा फुटल्याच्या मुद्द्यावरुन भाजपायाचे राजन म्हापसेकर यांनी बैठकीत भूमिका मांडली. त्यावर शिवसेनेचे सदस्य बाबुराव धुरी यांनी आक्षेप नोंदवला. नंतर यावरून राणे आणि राऊत यांच्यामध्ये वाद झाला. वाद नंतर टोकाला गेल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी केली. धरणाच्या फुटलेल्या कालव्याबद्दल संबंधित विभागाची बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. नंतर राऊत आणि राणे समर्थक शांत झालेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला