राष्ट्रवादी पुन्हा फुलणार! कार्यकर्त्यांनी अनिल गोटेंचे ऐकले ; बहुसंख्येने भाजप पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Anil Gote

मुंबई :- ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांच्या आशा पल्लवित झाल्या. त्यांनी ‘परत फिरा रे’ असे आवाहन भाजपवासी झालेल्यांना केले होते. त्यांच्या या आवाहनाला २४ तास पण उलटले नाही तोच त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. भाजपच्या मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधले.

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत भाजप मुंबईचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यावेळी अजय मकवाना, हर्षल गुरव, प्रथमेश मिस्री, विनायक पोळके, सुनील धुरी यांचे छगन भुजबळ यांनी पक्षात स्वागत केले.

उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येणाऱ्या काळात सत्तांतर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे (Anil Gote) यांनी एक पत्रक काढून भाजपात गेलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात येण्याचे निमंत्रण दिले. सध्या हे पत्रक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.

एकनाथ खडसे यांच्याआधीच धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनीही भाजपला राम राम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER