मंत्री पब-पार्टीत गुंग, कार्यकर्ते ‘गोली मार भेजे में’ स्टाईलमध्ये ; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला

Aaditya Thackeray - Ashish Shelar

मुंबई : पिस्तूल दाखवून ओव्हरटेक करणाऱ्या कथित शिवसैनिकांवर (Shiv Sena) भाजपने निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. एमआयएम (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी व्हिडीओ ट्विट करून थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कारवाईबाबत प्रश्न विचारले. त्यानंतर आता भाजप (BJP) आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि विशेषत: पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना लक्ष्य केले आहे.

शेलार म्हणाले, ज्या पद्धतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो बघितल्यावर स्पष्ट होतं की, यावेळी राज्याच्या सत्तेत बसलेले युवा मंत्री पब-पार्टी आणि फिल्मी दुनिया याच्यातच वावरत आहेत. कार्यकर्ते ‘गोली मार भेजे में’ अशा पद्धतीने फिल्मी स्टाईलमध्ये रस्त्यावर नाचत आहेत. दुर्दैवाने हे सर्व महाराष्ट्र पाहतो आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) या सरकारने महाराष्ट्राच्या संस्कृतीला अभिप्रेत असलेलं वर्तन करावं. स्वतःच्या कार्यकर्त्यांना आवरावे . फिल्मी दुनिया, पाणी, पार्टी हे काही महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन नाही, अशी टीका शेलार यांनी केली .

शेलार यांनी राज्य सरकारने लोकल रेल्वे सुरू करण्याबाबत घेतलेला निर्णय आणि त्याबाबत घातलेल्या अटींवरूनही टीकास्त्र सोडलं. “राज्य सरकारने लोकल ट्रेनच्या बाबतीत जो निर्णय घेतला, तो सर्व विचार करून घेतला असावा, अशी आमची अपेक्षा आहे; पण ज्या वेळेला आपण सर्व विचारांती असे म्हणतो तेव्हा तो सर्व समावेश अपेक्षित आहे. आज घेतलेल्या निर्णयामुळे सुविधांपेक्षा गोंधळ जास्त आणि त्या ठिकाणी सोयीपेक्षा अडचणी जास्त अशा स्वरूपाचा आहे. प्रवाशांच्या मनात गोंधळ झालेला आहे, असे शेलार म्हणाले. राज्य सरकारने विनंती केली आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या रेल्वे मंडळांनी मान्य केली आहे.

मला राज्य सरकारला विनंती करायची आहे की, आपण स्टेशनवर आणि प्लॅटफॉर्मवर जो गोंधळ होतो, तो कमीत कमी व्हावा किंवा होऊच नये या दिशेने एसओपी लवकर बनवावी. रेल्वे पोलिसांबरोबर तातडीची बैठक बोलवावी, त्या ठिकाणी अजून अडचणी निर्माण होणार नाही, अशा पद्धतीचं वातावरण आणि अशा पद्धतीचे सूचनाफलक याची व्यवस्था करावी. या सगळ्यांची बैठक तातडीने घेतली पाहिजे, असे आशिष शेलार यांनी नमूद केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER