राज्यभरात कार्यकर्ते नाराज; खडसेंची भाजपावर टीका

Eknath khadse

जळगाव : अहमदनगरमध्ये भाजपाच्या ३१० बुथप्रमुखांपैकी २५७ जणांनी बुथप्रमुखांसह सदस्यपदाचा राजीनामा दिला. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणालेत, राज्यभरात भाजपाचे (BJP) कार्यकर्ते नाराज आहेत म्हणून ते राजीनामे देत आहेत. ते आज सकाळी जळगावात त्यांच्या ‘मुक्ताई’ निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, अहमदनरमध्ये भाजपाचा धुसफूस चव्हाट्यावर आला. अहमदनगर जिल्हा भाजपा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी बंड पुकारले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भाजपाच्या ३१० बुथप्रमुखांपैकी २५७ बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील सदस्यांनी राजीनामा देऊन संचालन समिती स्थापन करत वेगळी चूल मांडली आहे. राज्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर भाजपात अन्याय होतो, असा आरोप करत श्रीरामपूर तालुक्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर पक्षाची ध्येयधोरणे न राबवता मनमानी कारभार करत आहेत, असा असंतुष्टांचा आरोप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER