पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात जो जबाबदार असणार त्यावर कारवाई होणार : रोहित पवार

Rohit Pawar & Pooja Chavhan

मुंबई :- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात जो जबाबदार असणार त्यावर कारवाई होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिली. मात्र त्याची चौकशी झाली पाहिजे त्यानंतरच कारवाई करता येणार, त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, असेही रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले .

पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये वनमंत्री असलेले संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. राठोड यांचे थेट नाव घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने सावध भूमिका घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER