… त्यानुसार कारवाई होईल, वझेप्रकरणी गृहमंत्र्यांची भूमिका स्पष्ट

Maharashtra Today

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी १३ तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वझे यांना ‘एनआयए’ने अटक केली. वझेंना शनिवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी अटक करण्यात आले. अटकेपूर्वी १३ तास वझेंची ‘एनआयए’कडून चौकशी करण्यात आली. याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmuk) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

शुक्रवारी सकाळी ११ वाजताच सचिन वझे ‘एनआयए’च्या कार्यालयात हजर झाले. तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू होती. १३ तासांच्या चौकशीअंती ‘एनआयए’ने त्यांना अटक केली. यानंतर भाजपा सरकारने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकार आणि गृह विभागाच्या कारवाईकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाष्य केले आहे.

भाजपा आक्रमक, नार्को टेस्टची मागणी

सचिन वझेंची नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपाचे नेते राम कदम यांनी केली आहे. कदम यांनी ठाकरे सरकारवर ट्विटकरून हल्लाबोल केला आहे. “अनिल देशमुखजी सचिन वझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट करा. होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी… अशी कोणती नावे आहेत ज्यांना महाराष्ट्र सरकार वाचवू पाहत आहे? टेस्ट करण्यात यावी जेणेकरून शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल.” असे ते तेजीत करत म्हणाले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात वझेप्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्यावर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. तसेच देशमुख यांच्याविरोधात फडणवीसांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. देशमुख यांनी अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याप्रकरणी फडणवीसांनी देशमुख यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस दिली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER