परभणी: निवडणूक प्रशिक्षणास 196 कर्मचारी गैरहजर; कर्मचा-यांवर होणार कारवाई

Action to be taken on employees absent in election training

परभणी/प्रतिनिधी : परभणी जिल्हयातील 04 विधानसभा मतदार संघातील निवडणुक 2019 करीता दिनांक 13 ऑक्टोंबर रोजी झालेल्या दुस – या प्रशिक्षणास विधानसभा मतदार संघनिहाय खालील प्रमाणे मतदान कर्मचारी गैरहजर राहीले आहेत अशी माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.

विधानसभा मतदार संघ 95 – जिंतुर 53, 96 – परभणी 20, 97 – गंगाखेड 62, तर 98 – पाथरी विधानसभा मतदारसंघात 20 असे एकूण 196 मतदान कर्मचारी हे प्रशिक्षणास गैरहजर राहीले आहेत .

गैरहजर कर्मचारी यांना संबंधीत निवडणुक निर्णय अधिकारी यांचे मार्फत कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेल्या आहेत. सदर कर्मचारी यांचे खुलासे प्राप्त झाल्यानंतर ज्या कर्मचारी यांचा खूलासा संयुक्तीक ठरणार नाही अशा कर्मचा याविरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 134 नुसार कारवाई करण्यात येणार आहे . तसेच गैरहजर कर्मचारी यांना निवडणुक विभागा कडून आवाहन करण्यात आले आहे की , त्यांनी त्यांची नियुक्ती ज्या विधानसभा मतदार संघामध्ये करण्यात आलेली आहे त्या विधानसभा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी यांचेकडे रुजू व्हावे. असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी कळविले आहे.