मनसेने दिलेल्या इशा-याची औरंगाबादेत कारवाई

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या भर सभेत गद्दारांवर कारवाई करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष गौतम अमराव यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. मनसेच्या अंतर्गत गोटातील बातम्या फोडल्याचा संशय त्याचप्रमाणे पक्षविरोधी कारवाया करणे आणि पक्षादेश न पाळणे हा आरोप गौतम आमराव यांच्यावर होता. त्यातूनच त्यांची हकालपट्टी केली आहे.

परीक्षाकाळात मशिदीवरील भोंगे बंद ठेवा; युवासेनेची मागणी

राज ठाकरे यांनी औरंगाबाद शहरातील कार्यकर्ता मेळाव्यात पक्षाच्या चुकीच्या बातम्या पत्रकारांना पुरवणा-या गद्दारांना पक्षातून हाकलण्याचा हा इशारा दिला होता. राज ठाकरे तीन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आले असता राज ठाकरे हे आपला औरंगाबाद दौरा अर्ध्यावर सोडणार आशा बातम्या समोर आल्या होत्या, त्यानंतर राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केले होते. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकांसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले होते. हे शहर आपले आहे. काम केले तर महापालिकेवर आपण झेंडा फडकवणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.