कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई योग्यच; मुंबई महापालिकेचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र

BMC-Kangana Ranaut

मुंबई :- अभिनेत्री कंगना रणौतने (kangna Ranaut) कार्यालय बांधताना महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृत बदल केला. त्यामुळे मुंबई महापालिकेने कारवाई केली. कंगनाच्या ऑफिसवरची कारवाई योग्यच होती, असे प्रतिज्ञापत्र मुंबई महापालिकेच्यावतीने उच्च न्यायालयात (HC) सादर करण्यात आले आहे. कंगनाच्या मालमत्तेत १४ नियमबाह्य बदल करण्यात आले होते. त्यामुळे केलेली कारवाई योग्यच असल्याची ठाम भूमिका मुंबई महापालिकेने (BMC)उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली आहे. आता उच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

मुंबई महानगरपालिकेने खारमधील पाली हिल येथील अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर कारवाई केल्यानंतर कंगनाने दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. यासाठी कंगनाने मुंबई (Mumbai) उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेला उत्तर देताना महापालिकेने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यात महापालिकेची कारवाई योग्यच असल्याचे म्हणण्यात आले आहे. खोटे दावे करत याचिका दाखल केल्याबद्दल कंगनावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER