देशद्रोहाअंतर्गत कारवाई व्हावी; बाबा रामदेवांच्या विरोधात IMAचे पंतप्रधानांना पत्र

PM Narendra Modi - IMA - Ramdev Baba

नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव (Ramdev Baba) आणि इंडियन मेडिकल असोसिएशनमधील (IMA) वाद शांत होण्याचे चिन्ह नाही. बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचे IMAने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिले आहे. यात केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. याशिवाय बाबा रामदेव यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी एका बाजूला नागरिकांना कोरोना (Corona) विरोधी लस घेण्याचे आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे ‘पतंजली’चे योगगुरू बाबा रामदेव कोरोना लसीचे दोन डोस घेऊनही देशात १० हजार डॉक्टर्सचा मृत्यू झाल्याचे सांगत फिरत आहेत. तर अ‍ॅलोपॅथीच्या उपचारांमुळे देशात रुग्णांनी जीव गमावला असल्याचे ते म्हणाले. त्यांचे हे विधान अतिशय दुर्दैवी आणि अशोभनीय आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर देशद्रोहाअंतर्गत कारवाई करावी.” अशी मागणी ‘IMA’कडून करण्यात आली आहे.

बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथीला मूर्ख विज्ञान ठरवून डॉक्टरांचा अपमान केला आहे. यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका ‘IMA’ने घेतली आहे. देशात आतापर्यंत २० कोटी लसीकरण झाले आहे आणि IMA लसीकरण मोहिमेला मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहे. लसीबद्दल जनतेच्या मनात असलेल्या शंकादेखील दूर करण्याचे काम IMAने केले असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button