‘मॉर्निंग वॉक’ला गेलेल्यांवर कारवाई; चाचणीत अर्ध्यापेक्षा जास्त निघाले पॉझिटिव्ह !

Morning Walk

पिंपरी-चिंचवड :- पुणे (Pune) शहर आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) परिसरात आता रुग्णसंख्या आटोक्यात येते आहे. कोरोनाचे (Corona) नियम लागू आहेत. निर्बंध तोडून सकाळी फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. अशा ७० नागरिकांची शनिवारी सकाळी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई करून ‘रॅपिड अँटीजन टेस्ट’ केली. त्यातले ३७ जण पॉझिटिव्ह निघालेत. हे पाहून पोलीसही चक्रावले आहेत.

प्रशासन वारंवार लॉकडाऊनबाबत (Lockdown) जनजागृती करते आहे. तरीही नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. सकाळच्या वेळेला बाहेर पडत नागरिकांची कोरोना चाचणी करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. पिंपरी-चिंचवडमधील मोशी, भोसरी तसेच प्राधिकरण या भागातील सकाळी फिरायला बाहेर पडणाऱ्यांवर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी कारवाई करून सुमारे ३५ हजार रुपये दंड वसूल केला.

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ७० नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांची कोरोना चाचणी केली असता ३७ नागरिक कोरोनाबाधित आढळून आल्याने चिंतेत भर पडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button