सैन्य तैनातीची अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई- गृहमंत्री अनिल देशमुख

anil-deshmukh

मुंबई : गृह मंत्रालयाने पाहिलं आहे की काही गुन्हेगार लोकांमध्ये दहशत व असंतोष निर्माण करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट बातम्या / अफवांची एक मोहीम चालवत आहेत.

कोरोना महामारी ही भारतासमोर व महाराष्ट्राच्या समोरही उभी ठाकलेली एक मोठी सार्वजनिक आरोग्य आपदा आहे. अशा परिस्थितीत अशी अफवा पसरवली जात आहे की, सैन्य मुंबई व महाराष्ट्रातील इतर शहरांवर संपूर्ण संचारबंदी लागू करण्यासाठी तैनात होणार आहे. या संदेशामध्ये लोकांना या कालावधीत भाजीपाला, किराणा आणि दूध यासारख्या गोष्टी जास्तीत जास्त जमा ठेवण्यास सांगितलं आहे.

ही बनावट बातमी असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. “नागरिकांनी अशा संदेशांवर विश्वास ठेवू नये किंवा त्यांना फॉरवर्ड करू नये; कारण यामुळे समाजात उगाचच घबराट पसरते. महाराष्ट्र सरकार कोविड -१९ विरुद्ध लढाईस वचनबद्ध आहे आणि या लढ्यातील धोरणात्मक निर्णयाबाबत नागरिकांना वेळोवेळी राज्य सरकार विश्वासात घेत आलं आहे.” असे ते म्हणाले व ताकीद दिली की, “अशा अफवा पसरवल्यास आयटी कायदा आणि आयपीसी या दोन्ही तरतुदीप्रमाणे दंड आणि शिक्षा होऊ शकते.

महाराष्ट्र सायबर विभाग या मुद्याकडे बारकाईने पाहात आहे आणि यापूर्वीच त्यांनी अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.” महाराष्ट्र सायबर विभागाच्या चौकशीत असे आढळले आहे की, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील १२ मुख्य युझर आयडी मे ८, २०२० पासून आजपर्यंत या अफवा / बनावट बातम्या पसरवत आहेत. अशा हँडल विरुद्ध सीआरपीसी सेक्शन १४९ अंतर्गत कायदेशीर चेतावणी देण्याच्या स्वरूपात महा. सायबरने यापूर्वीच नोटिसा पाठवल्या आहेत.

एफबी, ट्विटर यासारख्या प्लॅटफॉर्मवरदेखील ही पोस्ट काढून घ्या आणि जे ओळखले गेले आहेत अशा लोकांची खाती स्थगित करण्यास सांगण्यात आले आहे. देशमुखांनी असंही अधोरेखित केलं की, “राज्याचा गृहमंत्री म्हणून माझा ठाम विश्वास आहे की, महाराष्ट्र पोलीस कोणत्याही उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यास सक्षम आहेत.”


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER