ममता बॅनर्जींच्या अपघातप्रकरणी अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई

Mamata Banerjee

दिल्ली : नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात प्रचार करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या पायाला दुखापत झाली. या अपघाताबाबत ममता यांच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा झाला, या कारणावरून ममतांचे सुरक्षा संचालक विवेक सहाय यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

या घटनेबाबत तृणमूल काँग्रेसने ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप केला होता; पण त्यांचा अपघात झाल्याचे एका अहवालातून उघड झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठा हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवत निवडणूक आयोगाने बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली. मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा संचालक विवेक सहाय यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा होती. त्यात कुठे तरी त्रुटी राहिली, असा ठपका ठेवत त्यांच्यावर आठवडाभरात गुन्हा नोंदवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाने पूर्व मेदिनीपूरचे डीएम आणि डीईओ विभू पांडेय यांची बदली केली आहे. त्यांना निवडणूकव्यतिरिक्त इतर काम देण्यात आले आहे. त्यांच्या जागी स्मिता पांडेय यांच्याकडे डीएम पदाचा कारभार देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पूर्व मेदिनीपूरचे एसपी प्रवीण प्रकाश यांनाही निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारे ममता बॅनर्जी यांना झालेली दुखापत अधिकाऱ्यांना चांगलीच महागात पडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER