रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई अटळ? मुख्य सचिवांकडून मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर

rashmi Shukla - Maharastra Today

मुंबई :- फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण रश्मी शुक्ला यांच्याबाबतचा फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे सादर केला आहे. त्याचबरोबर रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी फोन टॅपिंग, पोलिसातल्या बढती संदर्भातील रॅकेट, परमबीर सिंग यांचे आरोप आणि सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, एकनाथ शिंदे आणि अनिल परबही उपस्थित होते.

मुख्य सचिवांनी सादर केलेल्या अहवालात रश्मी शुक्ला यांनी चुकीची माहिती देत फोन टॅपिंगची परवानगी मिळवली होती. त्यांनी काही जणांचे फोन टॅप केले असून, ते नियमात बसणारे असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या अहवालात नेमकं काय नमूद आहे हे अदयाप कळलेले नाही.

ही बातमी पण वाचा : रश्मी शुक्ला पाया पडत रडत म्हणाल्या होत्या, ‘मैं माफी मांगती हूँ”; जितेंद्र आव्हाडांचे  दावे!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER