दुचाकीवर दारु नेणा-यांसह अवैध विक्रेत्यांवर कारवाई

अवैध विक्रेत्यांवर कारवाई

औरंगाबाद : दुचाकीवरुन देशी दारुची वाहतूक करणा-या तिघांना वाहतूक पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून ४१६ रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली. स्वप्निल प्रभुदास जाधव (२६, रा. राजूनगर), लक्ष्मण यमाजी वाघ (४०, रा. सिल्कमिल कॉलनी) आणि राजू मुक्ता तेलोरे (२२, रा. महूनगर) अशी तिघांची नावे आहेत. ही कारवाई मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास पंढरपूर भागातील ओअ‍ॅसिस चौकात करण्यात आली. तसेच अवैधरित्या विक्री करण्यासाठी देशी दारु घेऊन जाणा-या दोन महिलेला पकडत पोलिसांनी १ हजार ८७२ रुपयांची दारु जप्त केली. त्यांच्याविरुध्द एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER