‘लव्ह जिहाद’ थांबण्यासाठी लवकरच करू कायदा – योगी आदित्यनाथ यांचा इशारा

देवरिया : उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहादच्या वाढत्या प्रकरणांबाबत नाराजी व्यक्त करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) म्हणाले की, ‘लव्ह जिहाद’ थांबण्यासाठी लवकरच करू कायदा करू. ते देवरिया येथे निडणुकीच्या प्रचार सभेत बोलत होते.

हायकोर्टाच्या एका निकालाचा हवाला देऊन योगी म्हणाले की, लग्न केले म्हणून धर्म परिवर्तन करणे वैध नाही. लव्ह जिहादची प्रकरणे थांबविण्यासाठी आम्ही लवकरच कायदा बनविणार आहोत. जे ओळख लपवून आमच्या भगिनींच्या सन्मानासोबत खेळ करत आहेत, त्यांना मी इशारा देतो की सुधरा, नाही तर आम्हाला तुमची राम नाम सत्यची यात्रा काढावी लागेल.

ते म्हणाले की, काही लोक वेश आणि नाव बदलून मुलींच्या भावनांशी खेळ करतात. त्यांना मी इशारा देऊ इच्छितो की तुमची आता राम नाम सत्यची यात्रा निघणार आहे. ‘मिशन शक्ती’ कार्यक्रम यासाठीच चालविला जाणार आहे. मिशन शक्ती म्हणजे प्रत्येक आई-बहिणीच्या सुरक्षेची हमी आणि तरिही काही लोकांनी लव्ह जिहाद केल्यास ऑपरेशन शक्ति तयार आहे. हायकोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करुन मुली-बहिणींचे रक्षण केले जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER