प्राणवायू कारखाने अधिग्रहित करावेत…

Acquired Oxygen factories due to corona crises.jpg

Shailendra Paranjapeकरोनाकाळात (Corona Virus) रुग्णसंख्या वाढत असल्याने आणि अत्यवस्थ रुग्णांची संख्याही कमी होत नसल्याने प्राणवायूचा पुरवठा हा कळीचा आणि चिंतेचाही मुद्दा झाला आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातल्या पाचही जिल्ह्यात त्यातही ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यात व्हेंटिलेटर्स आणि प्राणवायूची (Oxygen) सुविधा असलेले बेड्स किंवा खाटा यांचा पुरवठा, सोय मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे.

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जवळपास नियमितपणे बैठकांचं सत्र सुरू करून पुण्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केलीय. त्या बैठकीत त्यांनी प्राणवायू नेणाऱ्या टँकर्सना रुग्णवाहिकेसारखीच सायरन किंवा भोंगा वाजवण्याची मुभा द्यावी आणि वाहतूक पोलिसांनीही प्राणवायूचे टँकर्स वाहतुकीच्या खोळंब्यात अडकणार नाहीत, यी काळजी घ्यावी, अश सूचना केल्या आहेत.

अधिक महिना असल्याने ऑक्टबोरच्या अखेरीस विजयादशमी किंवा दसऱ्याचा सण येत आहे. आपल्याकडे नवरात्रीत हस्त नक्षत्राचा म्हणजे मुसळधार म्हणता येईल, असा पाऊस होतो. त्यामुळे सध्या पुण्यामधे दिवसाच्या कोणत्याही वेळी आणि संध्याकाळी नक्की पडणाऱ्या पावसामुळे करोनाव्यतिरिक्त इतर छोटे आजारही पसरण्याची भीती आहे. हवा स्वच्छ निरभ्र न राहता ढगाळ, कोंदट राहिल्याने सूक्ष्मजीवही कार्यरत होऊन आजार पसरण्याची भीती काही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. त्यामुळे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास म्हणायची वेळ येऊ शकते.

त्यामुळे अगदी कंटाळा आला तरी सुद्धा करोनासंदर्भातल्या सर्वांना पाठ झालेल्या सूचनांची पुन्हा पुन्हा आठवण करायला हवीय. सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर अत्यावश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळायलाच हवे आणि आता हॉटेल्स, बसगाड्या सुरू होत असताना तर या गोष्टींचे पालन अगदीच काटेकोरपणे व्हायला हवे.

करोनाची भीती एप्रिल महिन्यात होती तितकीशी राहिलेली नसली तरी बेदरकार होणे परवडणारे नाही, याचीही खूणगाठ बांधायला हवी. लशीच्या चाचण्यांवर इंग्लंडमधील नकारात्मक अनुभव आणि अमेरिकी निव़णुकांमुळे जागतिक पातळीवर बंदी येत असताना लसविसनाला आणि प्रत्यक्षात देशातल्या जगातल्या सर्व नागरिकांप्रयंत लस पोचायला, टोचायला किमान जानेवारी-फेब्रुवारी तरी उजाडणार आहे, हेही लक्षात घ्यायला हवं.

त्यामुळेच लसविकसनाचे काम विविध औषध कंपन्या, विद्यापीठे, संशोधन संस्था आदींद्वारे निरंतरपणे केले जाईल लस यायची तेव्हा येईल पण लस येत नाही आणि ती सर्वांना टोचली जात नाही, तोवर करोना ही लाइटली किंवा बेदरकारपणे घेम्याची गोष्ट नक्कीच नाही, याची आठवणही वारंवार करून द्यायला हवी. एका टीव्ही शोसाठी गेलो असताना एक प्रवक्ते अगदीच अभिमानाने सांगत होते की त्यांनी अगदी मार्च महिन्यापासून आत्तापर्यंत कधीही मास्क वापरला नाही पण आता पोलीस दंड करताहेत, त्यामुळे वापरावा लागतोय.

हे उद्गार अगदीच पुणेरी थाटाचे होते. कारण पुण्यात कोणत्याही सिग्नलला पुढे पोलीस उभा असेल तरच तांबड्या दिव्याचा अर्थ थांबा असा असतो. अन्यथा, पोलीस नसल्यास हळूच मुसंडी मारून मागे न बघता गाडी दामटायची असते, या कृतीची आठवण त्या प्रवक्त्यांच्या अभिमानपूर्वक नोंदवलेल्या माहितीने झाली. मीही त्यांना माझ्या क्षमतेनुसार समजावून सांगायचा प्रयत्न केला पण आजही करोना लाइटली घेणारे लोक आजूबाजूला दिसतील. त्यांना हे सारं तुमच्या आणि समाजाच्याही हिताचं आहे, हे सांगायला थोटा वेळ घालवावा लागला तरी घालवा. कारण करोना हे समाज, देश आणि जगाचंच युद्ध आहे. ते आपल्या सर्वांना लढायलाच हवं. त्यातून सुटका नाही.

प्राणवायूच्या कमतरतेमधे गरज नसताना घरी प्राणवू सिलेंडर आणून ठेवण्याचे प्रकार पुण्यात घडत आहेत, अशा बातम्या वृत्तपत्रातून झळकल्यात. डाळींचे भाव वाढवणारे, कटिंग चहा दहा रुपयाला देणारे, सर्वच वस्तूंचे भाव वाढवणारे आणि घरात गरज नसताना प्राणवायू सिलेंडर जमवून ठेवणारे, हे सारेच करोना युद्धात समाजाची ताकद क्षीण करू शतात. त्यामुळे किमान प्रामवायूचा काला बाजार होणार नाही, यासाठी सरकारनं दुष्काळात खासगी विहिरी अधिग्रहित करतात, तशा पद्धतीने प्राणवायूनिर्मितीचे कारखाने, प्लान्ट्स सरकारी ताब्यात घ्यावेत कारम येमाऱ्या काही दिवसात प्राणवायूचे संकटच करोनाइतके गहिरे होण्याची चिन्हं आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER