प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला करून पेटवले; आरोपी २४ तासांत गजाआड

Acid Attack - Beed

बीड : प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला (Acid Attack) करून तिला पेट्रोल टाकून पेटवून देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी २४ तासांत गजाआड केले. पीडित तरुणीचा सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात होता. राजकीय वर्तुळातूनही कठोर कारवाईची मागणी करण्यात येत होती. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून आरोपी अविनाश राजुरे याला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता.

घटना
दिवाळीसाठी पुण्याहून गावी परतणाऱ्या तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून जिवंत जळल्याची घटना येळंबघाट ( ता. बीड ) येथे घडली. गंभीर भाजलेल्या तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी व मयत तरुणी पुण्यात सोबत ( लिव्ह इन रिलेशनशिप ) राहात होते अशी माहिती आहे.

बीड (Beed) तालुक्यातील येळंबघाट येथे शनिवारी रस्त्यालगत २२ वर्षीय तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली. शेळगाव (ता.देगलूर जि. नांदेड ) येथील तरुणी गावातीलच एका तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होती. १३ नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहून गावी परतण्यासाठी दुचाकीवरून निघालेत. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास येळंबघाट (ता.बीड ) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा – केज मुख्य रस्त्यावरून जात असताना तरुणाने दुचाकी थांबवली. तरुणीला रस्त्याच्या कडेला नेऊन तिच्यावर अ‍ॅसिड टाकले व तिला पेट्रोल टाकून पेटवून दिले.

पीडित तरुणी अ‍ॅसिड हल्ला आणि पेट्रोलने ४८ टक्के भाजली. सुमारे १२ तास रस्त्याशेजारी पडून होती. दुपारी २ वाजता काही वाहनधारकांना आवाज आल्याने त्यांनी खड्ड्यात पाहिले. पोलिसांना माहिती दिली. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. जबाब नोंदवण्यात आला. अविनाश राजुरे या तरुणाविरुद्ध नेकनूर ( ता.बीड ) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER