100 कोटींच्या टारगेट प्रकरणावरुन आचार्य तुषार भोसले यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

Maharashtra Today

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सचिन वाझे याला दरमहिन्याला १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले असल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप नुकतेच मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आलेले पोलीस अधिकारी आणि गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह (Parambir singh) यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही माहिती दिली आहे. यावरून भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले(Acharya Tushar Bhosale) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला .

मंदिर बंद ठेवून या ठाकरे सरकारला पब आणि बार सुरू करण्याची घाई का झाली होती, हे आता सगळ्या महाराष्ट्राला कळतं आहे. १०० कोटींच्या टारगेटसाठी (Rs 100 crore target case) तुम्ही देवांना कोंडून ठेवलं, हे पाप तुम्हाला फेडावं लागेल, असे भोसले म्हणाले .आज गृहमंत्र्यांना घरी जावं लागेल पण हे सरकारही लवकरच जाणार ही तर महावसुली आघाडी निघाली, असेही ते म्हणाले . तसेच भोसले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पाठराखणही केली आहे . फडणवीस तुम्हारे “पापा” समेंत MVA कें “पापों” को एक्सपोज करेगा , असे ट्विटही भोसले यांनी केले आहे.

ही बातमी पण वाचा : फोन टॅपिंग अहवाल म्हणजे भिजलेला लवंगी फटाका – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER