हा “घंटानाद” ठाकरे सरकारचा कर्दनकाळ ठरेल – आचार्य तुषार भोसले

Acharya Tushar Bhosale on uddhav govt

मुंबई : राज्यातील मंदिरे खुली करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यातील भाजपाने (BJP) शनिवारी ‘दार उघड उध्दवा दार उघड’ या आंदोलनाला सुरुवात केली. हे घंटानाद आंदोलन म्हणजे ठाकरे सरकार (Thackeray Govt) करिता धोक्याची घंटा आहे , हे जर असेच सुरु राहिले तर आज या पवित्र गोदाकाठावर आणि या धर्माचार्यांच्या साक्षीने सांगतो की हाच घंटानाद या ठाकरे सरकारचा कर्दनकाळ ठरेल , असे वक्तव्य आध्यात्मिक समन्वय आघाडीचे (Mahavikas Aghadi) प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी केले आहे.

ही बातमी पण वाचा:- दार उघड उद्धवा दार उघड’, राज्यभरातील मंदिरांसमोर भाजपच्या आंदोलनाला सुरुवात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या भावनांचा आदर करुन त्वरित मंदिरे उघडावीत . आता त्यांनी देव भक्तांच्या आड येऊ नये कारण आधीच महाराष्ट्रात गेल्या ६ महिन्यांपासून साधु-संतांचा आणि धार्मिक क्षेत्राचा छळ होत असल्याने या सरकारच्या पापाचा घडा भरत आला, असेही भोसले म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER