आरोपी सुधा भारद्वाज यांना तुरुंगात मिळणार पुस्तके

मुंबई: भीमा-कोरेगाव हिंसाचार (Bhima-Koregaon case) खटल्यातील अटकेत असलेल्या आरोपी व वकील सुधा भारद्वाज (Sudha Bhardwaj) यांना तुरुंगात वाचण्यासाठी बाहेरून आणलेली पाच पुस्तके दरमहिन्याला उपलब्ध करून द्यावी, असा आदेश सत्र न्यायालयाने दिला. अ‍ॅड. भारद्वाज भायखळा कारागृहात आहेत. आपल्याला वाचण्यासाठी पुस्तके द्यावीत, अशी विनंती त्यांनी कारागृह प्रशासनास केली होती.

परंतु सत्र न्यायालयाने परवानगी दिल्याशिवाय पुस्तके देता येणार नाहीत, असे अधीक्षकांनी त्यांना सांगितले. म्हणून त्यांनी न्यायालयात अर्ज केला. तो मंजूर करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. ई. कोठाळीकर यांनी वरीलप्रमाणे आदेश दिला. मात्र भारद्वाज जी पुस्तके बाहेरून मागवतील त्यात अश्लीलतेच्या दृष्टीने कोणताही आक्षेपार्ह मजकूर तसेच बंदी घातलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विचारांचा प्रचार करणारा कोणताही मजकूर असणार नाही याची तुरुंग अधीक्षकांनी खात्री करून मगच पुस्तके भारद्वाज यांना द्यावीत, असे न्यायाधीशांनी आदेशात नमूद केले.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER