पुसद-वाशिम उड्डाणपुलाच्या बांधकामात कोटींचा अपहार, भावना गवळींचा आरोप

bhavnagawali

पुसद :  गत कित्येक वर्षांपासून रखडलेल्या वाशिम येथील पुसद रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाचा (Pusad-Washim flyover) प्रश्न निकाली निघाला व बांधकामदेखील सुरू झाले. मात्र, मध्यंतरी हे बांधकाम थांबवण्यात आले. त्यानंतर या बांधकामाचा दर्जा व सध्याची अवस्था पाहून भावना गवळी यांनी बांधकामात कोटींचा अपहार झाल्याचा आरोप केला आहे.

बांधकामासाठी रेल्वे खात्याकडून निधी घेतल्याचे त्या बोलल्या. या बांधकामात कंत्राटदार व त्याखाकील लोकांमध्ये हा अपहार झाल्याचा आरोप भावना गवळी यांनी केला.

वाशिम शहरामधून जाणाऱ्या पुसद मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग गेट क्र. ११४ मुळे सतत वाहतुक कोंडी होते. या त्रासामुळे शहरवासी आणि या मार्गस्थ येणारे , जाणारे प्रवाशी वैतागून गेले आहेत. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी त्या ठिकाणी उड्डानपूल बांधणे आवश्यक आहे ही बाब खासदार भावना गवळी यांनी लावून धरली आणि केंद्र शासनाकडे सतत पाठपुरावा करून केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत पुसद रेल्वे गेट क्रॉसिंग गेट क्रमांक ११४ व हिंगोली रेल्वे गेट क्रॉसिंग गेट क्रमांक ११५ वरील उड्डाण पूल मंजुर करून घेतले होते. त्यापैकी पुसद रेल्वे क्रॉसींगवरील उड्डाण पुलाचे काम सा.बां.विभाग वाशिम व रेल्वे विभागाकडुन संयुक्तपणे करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER