रिया चक्रवर्तीसह आरोपींच्या जामिनावर निकाल राखीव

Rhea Chakraborty

मुंबई : केंद्र सरकारच्या अमलीपदार्थविरोधी विभागाने अटक केलेली बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक व इतर आरोपींनी जामिनासाठी केलेल्या अर्जांवरील निकाल मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला. रिया व शोविकसह अब्देल बशिर परिहार, सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत यांनी केलेल्या जामीन अर्जांवर प्रदीर्घ काळ चाललेली सुनावणी न्या. एस. व्ही. कोतवाल यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत बसून पूर्ण केली. त्यानंतर आपण निकाल राखून ठेवत असल्याचे सांगताना न्या. कोतवाल म्हणाले की, शक्यतो मी प्रत्येक अर्जावर स्वतंत्र निकाल देण्याचा प्रयत्न करीन.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्याला असलेले अमलीपदार्थांचे व्यसन व ते पदार्थ त्याला कोण पुरवायचे याची माहिती ‘सीबीआय’ तपासातून उघड झाल्यानंतर ‘एनसीबी’ने अमलीपदार्थ नियंत्रण कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हा नोंदवून रियासह इतरांना अटक केली. विशेष न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर या आरोपींनी उच्च न्यायालयात अर्ज केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER