
मुंबई :- मुंबईमधील शक्ती मिल सामूहिक बलात्कारप्रकरणात (Shaktimil gang rape in Mumbai) आकाश जाधव या आरोपीला पुन्हा अटक केली आहे. आकाश हा २५ वर्षांचा आहे. या बलात्कारप्रकरणात अल्पवयीन तुरुंगवासाच्या शिक्षेवर सुटलेल्या आकाश जाधवला मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण खात्याच्या पथकाने गंभीर गुन्ह्यासाठी पुन्हा अटक (Accused re-arrested) केली.
आकाश आणि त्याचा साथीदार अंकित नाईक यांनी रिझवान कुरेशीवर चाकूने हल्ला केला. त्याला गंभीर जखमी केले. या प्रकरणात आकाश आणि अंकितला अटक करण्यात आली आहे. आकाश जाधवची शक्ती मिलमधून सुटका झाल्यावर त्याने पुन्हा टोळी उभारली आणि विविध परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. आकाशवर दोन हत्या, जीवे मारण्याची धमकी, गंभीररीत्या जखमी करणे, मारहाण करणे, खंडणी वसुली आदी प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
माहितीनुसार, मुंबईतील आर. ए. के पोलीस स्टेशनमध्ये आकाश जाधवर हप्ता वसुली आणि हाफ मर्डर केल्याचे गुन्हे दाखल आहेत. आकाश हा अल्पवयीन असल्यामुळे त्याला लवकर सोडण्यात आले. रिजवान कुरेशी यांच्यावर चाकूने हल्ला करून दोघेही आरोपी डोंबिवलीला फरार झाले. कुरेशी यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला